टुरीस्ट गाईड होण्याची संधी – मोफत ऑनलाईन प्रशिक्षण
Tourist Guide Bharti 2021
Tourist Guide Recruitment 2021: This is good news for tourists who love tourism. free online tourist guide training will be imparted to the youth of the state. Interested applicants need to contact on ०२२-६२९४८८१७ or Email address [email protected]
Tourist Guide Bharti 2021- महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी ०२२-६२९४८८१७ या क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षित जिल्ह्यांचे अधिवासीत रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.
Tourist Guide Recruitment 2021 -Eligibility Criteria
- उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा.
- उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.
Tourist Guide Recruitment 2021: This is good news for tourists who love tourism. The state government plans to recruit 1000 tourist guides in the state. Under this scheme, free online tourist guide training will be imparted to the youth of the state. After the training, you will be given a certificate from the Government of Maharashtra as a tourist guide and an opportunity to work as a tourist guide in a tourist destination
I am interested
I love traveling
Yes I am entrested
Yes I am interested
मोफत ऑनलाईन प्रशिक्षिणासाठी लिंक पाठविणे