औरंगाबाद पालिकेत नव्याने 4,975 पदांची भरती होणार
Aurangabad Mahangarpalika Vacancy 2021
Aurangabad Mahangarpalika Bharti 2021: The structure of the corporation is in the final stage of court approval. There are indications that it will be approved soon. These posts have been increased in the diagram considering the expansion of the city and the changed working methods. According to this figure, 4,975 new posts will be recruited in the corporation. Therefore, with the sanctioned new posts, the total number of posts in the municipality will be 9,081.
औरंगाबाद पालिकेत नव्याने 4,975 पदांची भरती होणार
महापालिकेचा आकृतिबंध शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम चरणावर आहे. लवकरच तो मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. शहराचा विस्तार आणि बदलेली कार्यपद्धती यांचा विचार करुन आकृतिबंधात ही पदे वाढवण्यात आली आहेत. या आकृतिबंधानुसार पालिकेत नव्याने 4,975 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे मंजुर नवीन पदांसह पालिकेतील पदांची एकूण संख्या 9,081 एवढी होणार आहे. आकृतिबंध मंजूर होताच भरतीची प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
औरंगाबाद पालिकेची 38 वर्षांपूर्वी स्थापना झाली. त्यानंतर दहा वर्षांनी 1992 साली पालिकेत नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर मात्र मंजूर पदांमध्ये आजवर कोणतीही वाढ झाली नाही. दरम्यानच्या काळात शहराची लोकसंख्या वाढली, चारही दिशांनी शहराचा विस्तार देखील झाला. त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे. तसेच सुरूवातीला भरती झालेले बहुसंख्य अधिकारी कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा जण सेवानिवृत्त होत असल्याने सध्या अनेक पदे रिक्त झाली आहेत.
त्यामुळेच पालिकेने पाच वर्षांपूर्वी नवीन आकृतीबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र वेगवेगळ्या कारणांनी हा आकृतीबंध प्रलंबितच राहिला. आता गतवर्षी 15 फेब्रुवारी 2020 रोजी पालिकेने अधिकारी कर्मचारी भरतीचा नवीन आकृतीबंध तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यात शासनाकडून वारंवार त्रुटी काढण्यात आल्या. त्या सर्वांची पुर्तताही आता पालिकेने केली आहे. आता सचिव स्तरावरुन हा आकृतीबंध मंजूर होऊन नगरविकास मंत्र्यांकडे सादर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार नगर विकास मंत्र्यांकडून तो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल. नंतर लवकरच त्यास अंतिम मंजूर मिळेल, अशी शक्यता गृहित धरून त्यानुसार प्रशासनाने नवीन नोकर भरतीची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी वाढवली आहेत पदे (Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021) : जुन्या आकृतिबंधानुसार पालिकेत सध्या 4,106 पदे मंजूर आहेत. नवीन आकृतीबंधात ही संख्या 4,975 ने वाढवून 9,081 एवढी प्रस्तावित केली आहे. यात वर्ग 1 ची 8, वर्ग 2 ची 10, वर्ग 3 ची 1,902 आणि वर्ग 2,981 पदे वाढवली आहेत.