महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कल्पना ऑनलाइन सादर करण्याची संधी
InoFest 2021 for Startup Opportunity
InoFest 2021 for startups: In collaboration with Pimpri-Chinchwad Smart City, Savitribai Phule Pune University Center for Innovation and Pimpri-Chinchwad Startup Innovation Center (PCSIC) have jointly organized InoFest 2021 for startups. It will feature hackathon, i-to-e competition, pitch fest and finals. The initiative is organized to bring together the startup ecosystem, and the boot camp will provide festive spotting innovators, startup ideas and guidance, said Mayor Usha Dhore.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कल्पना ऑनलाइन सादर करण्याची संधी
स्टार्टअपसाठी ‘इनोफेस्ट २०२१ ;पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेंटर फॉर इनोव्हेशन आणि पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इनोव्हेशन सेंटर (पीसीएसआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी ‘इनोफेस्ट २०२१’ आयोजित केले आहे. यामध्ये हॅकेथॉन, आय-टु-ई स्पर्धा, पिच फेस्ट व अंतिम फेरी होणार आहे. स्टार्टअप इकोसिस्टम एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असून, बूट शिबिराद्वारे उत्सव स्पॉटिंग इनोव्हेटर, स्टार्टअप कल्पना व त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.
नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी दैनंदिन जीवनात नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, शहरातील नागरिकांना मदत करणे, त्यांना उभारी देण्यासाठी व सर्वोच्च मार्गदर्शनासाठी स्टार्टअप उभारणे, शहर प% 4िसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाA4ीन्यपूर्ण प्रकल्प वाढविण्यात व उद्योजक मानसिकतेसाठी मदत करणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे, हा यामागील उद्देश आहे. स्टार्टअप इनोव्हेशन सेल स्थापन केलेले २५० महाविद्यालये सहभागी होणार आहेत. स्टार्टअप कल्पना घेऊन क्लस्टर फेरीत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. यातून कल्पना निवडून अंतिम फेरीसाठी स्पर्धा होईल. बूट शिबिरात तज्ज्ञांकडून तीन दिवस मार्गदर्शन मिळेल. परीक्षक मंडळ विविध स्तरांवर प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करतील. स्पर्धेसाठी एका संघात किमान दोन व कमाल चार सदस्य असतील.
घनकचरा व्यवस्थापन – टाकाऊतून टिकाऊ व कचरा प्रक्रिया; वाहतूक व दळणवळण ः ई-व्हेईकल विकास व सुरक्षित वाहतूक; अक्षय ऊर्जा ः पवन, सौर, जैव इंधन, समुद्री लाटा व हायड्रोजन; ॲग्रोटेक ः कृषी अवजारांमध्ये नावीन्य, फ्लोरिक्लचर, वितरण व साठवणूक; हेल्थटेक – आरोग्यविषयक कल्पना, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यासाठी हॅकेथॉन आयोजित केले आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. ‘इनो-फेस्ट’ची माहिती