MPSC’ तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये बदल-जाणून घ्या
Changes in MPSC Technical Services Examination
Changes in MPSC Technical Services Examination: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has made major changes in the examination system of technical services. The Maharashtra Forest Service, Maharashtra Agriculture Service, and Maharashtra Engineering Services will now have a single joint pre-examination called ‘Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre-Examination’ without any separate examination.
MPSC’ तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल के ला आहे. महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२१मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.
“एमपीएससी’ परीक्षेचा निर्णय डिसेंबरअखेर!
एमपीएससीने संके तस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. तसेच या संवर्गाच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट के ले आहे.
संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किं वा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील. त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षायोजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध के ला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली.
आतापर्यंत उमेदवारांना तीन परीक्षांसाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क भरावे लागत होते. तसेच परीक्षांचा अभ्यासही स्वतंत्रपणे करावा लागत होता. सर्वसाधारणपणे तीनही परीक्षांसाठी सामाईक उमेदवारांची संख्या मोठी होती. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. संयुक्त पूर्वपरीक्षा उमेदवारांसाठी सर्वच बाजूंनी सोयीची ठरणार आहे.