खेळाडूंसाठी खुषखबर ! महापौर चषक पुन्हा होणार सुरु
Good News For Players! Mayor’s Cup Resumes; Includes 8 Games
The mayor held a meeting a few months ago with a view to starting the cup, but was told the municipality was not in a financial position. Now a separate provision will be made in the forthcoming budget with a view to starting the Mayor’s Cup. So that the players of Solapur will have a platform of rights. The Cup will include ‘these’ games like Kabaddi, Kho-Kho, Basketball, Handball, Volleyball will be played with state and national players. Wrestling and bodybuilding will be played at the district level. Cricket is expected to be decided at the state or district level.
खेळाडूंसाठी खुषखबर ! महापौर चषक पुन्हा होणार सुरु; ‘या’ खेळांचा असेल समावेश
राज्यातील, देशातील खेळाडूंसोबत सोलापुरातील खेळाडूंना खेळण्याचे एक व्यासपीठ मिळावे, खेळांबद्दल प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने महापौर चषक सुरु करण्यात आला होता. मात्र, माजी महापौर नलिनी चंदेले यांच्यानंतर हा चषक बंद पडला. त्याला तिजोरीत पैसा नसल्याचे कारण महापालिकेने दिले. मात्र, खेळाडूंची मागणी, महापौर श्रीकांचना यन्नम यांचा पुढाकार आणि क्रीडाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार आता हा चषक पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
बजेटमध्ये केली जाईल तरतूद
महापौर चषक सुरु करण्याच्या दृष्टीने काही महिन्यांपूर्वी बैठक घेतली, परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याचे सांगण्यात आले. आता आगामी बजेटमध्ये महापौर चषक सुरु करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र तरतूद केली जाईल. जेणेकरुन सोलापुरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल.
महापालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये शालेयस्तरावरील स्पर्धांसाठी सुमारे दहा लाख, स्विमिंग पूलसह मैदानांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी 15 ते 20 लाखांपर्यंत तरतूद केली जाते. दिव्यांगांच्या स्पर्धांसाठीही निधीची तरतूद केली जाते. मात्र, त्यातील 60 टक्केही निधी खर्च होत नसल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. तरीही 16 वर्षांपूर्वी निधीचे कारण पुढे करुन महापौर चषक बंद करण्यात आला. त्याला दुष्काळ, पाणी टंचाईचेही कारण अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, आपल्या काळात सोलापुरातील खेळाडूंसाठी महापौर चषक सुरु व्हावा यादृष्टीने श्रीकाचंना यन्नम यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापूर क्रिकेट असोसिएशननेही तशी मागणी केली आहे. क्रीडाधिकारी नजीर शेख म्हणाले, महापौर चषक सुरु करण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार करीत आहोत. तो प्रस्ताव महापालिकेकडे दिला जाईल.
चषकात ‘या’ खेळांचा असेल समावेश
कबड्डी, खो- खो, बास्केट बॉल, हॅण्डबॉल, हॉलिबॉल हे खेळ राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळले जातील. तर कुस्ती व शरीरशैष्ठव हे खेळ जिल्हास्तरीय खेळविले जाणार आहेत. क्रिकेट हा खेळ राज्यस्तरीय की जिल्हास्तरीय खेळवायचे, यावर निर्णय अपेक्षित आहे. तत्पूर्वी, महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त, क्रीडाधिकारी व क्रिकेट असोसिएशनमधील काही पदाधिकाऱ्यांची समिती चषकातील खेळांबद्दल निर्णय घेतील, असेही सांगण्यात आले.
सोर्स: सकाळ