मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर जारी
Mumbai University Academic Calendar Declared
The university administration has finally announced the academic schedule for the colleges affiliated with the University of Mumbai. According to the schedule, college students’ vacation will be reduced this year, and only 13 days of summer vacation will be given. At the same time, the teachers’ unions are criticizing that the required academic period is not being completed as per the norms of the University Grants Commission
मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांसाठी विद्यापीठ प्रशासनाने अखेर शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार यंदा कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या सुट्टीत कपात होणार असून, अवघ्या १३ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. याचबरोबर सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार आवश्यक शैक्षणिक कालावधीही पूर्ण होत नसल्याची टीकाही शिक्षक संघटना करत आहेत.
राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा सर्वच कॉलेजांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाकडे सर्व कॉलेजांचे लक्ष लागून राहिले होते. कॉलेजांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू होईल. यासाठी कॉलेजांची तयारी पूर्ण झाली असून, दुसऱ्या सत्रातही ऑनलाइन लेक्चरद्वारेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कॉलेजांनी त्यांचे पहिले सत्र ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरे सत्र १ जानेवारी, २०२१ ते ३१ मे, २०२१पर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यानंतर १ ते १३ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल. या वेळापत्रकाच्या आधारे ९० दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होत नसल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाने उपकेंद्रासाठीही वेळापत्रक जाहीर केले आहे. ठाणे उपकेंद्रातील बीएमस आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी देखील वेळापत्रक जाहीर केले आहे.
असे आहे वेळापत्रक
- पहिले सत्र : ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर, २०२०
- दुसरे सत्र : १ जानेवारी ते ३१ मे, २०२१
- उन्हाळी सुट्टी : १ जून ते १३ जून, २०२१
प्रथम वर्षासाठी नवे वेळापत्रक?
इंजिनीअरिंग, एमबीए, विधी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यामुळे प्रथम वर्षासाठी हे वेळापत्रक लागू होऊ शकणार नाही. यामुळे यासाठी विद्यापीठ स्वतंत्रपणे पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहे का, असा प्रश्नही प्राध्यापक विचारत आहेत.
Mumbai University Declare Exam Timetable For Students
The Mumbai university has announced the schedule for the first session (winter) examinations of the academic year 2020-21. The examinations in Arts, Commerce and Science will be held till December 31, while the examinations for vocational courses will be held till January 15.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; पहिल्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक झाले जाहीर
विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या सत्राच्या (हिवाळी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षा 31 डिसेंबर पर्यंत होणार आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जानेवारी पर्यंत होणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजन निर्देशानुसार परीक्षांच्या तारखा व नियोजन करण्याबाबत कणकवली महाविद्यालयात जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुखांची सहविचार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे होत्या. तसेच कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र चौगुले, देवगड कॉलेज प्राचार्या डॉ. सुखदा जांभळे, फोंडाघाट कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश कामत, फणसगाव कॉलेजचे डॉ.आशिष नाईक, प्रा.वासिम सय्यद आदी उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाच्या नियोजनानुसार प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाच्या सेमिस्टर एकच्या परीक्षा 9 जानेवारी 2021 पर्यंत घ्याव्यात असे ठरविण्यात आले. यात कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 60 गुणांच्या ऑनलाइन पद्धतीने होतील. यात 50 बहुपर्यायी प्रश्न असतील. तसेच या परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या सभेचे सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. विनय दुबळे यांनी केले.