सीए फाउंडेशन पेपर १ परीक्षा लांबणीवर
ICAI CA Foundation Paper 1 Exam Postponed
ICAI CA Foundation Paper 1 Exam Postponed
The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has postponed the Foundation Paper-1 examination. The exam was scheduled for Tuesday, December 8. The exam has been postponed on the backdrop of a nationwide strike on December 8. The exam will now be held on December 13. No change has been made in the examination schedule of other subjects
सीए फाउंडेशन पेपर १ परीक्षा लांबणीवर
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडिया (ICAI) ने फाउंडेशन पेपर – १ परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा मंगळवारी ८ डिसेंबर रोजी होणार होती. ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता १३ डिसेंबर रोजी होणार आहे. अन्य विषयांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही
यासंदर्भात आयसीएआयने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘काही अपरिहार्य कारणांमुळे चार्टर्ड अकाउंटन्टस् फाउंडेशन पेपर – १, प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटिंग या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. ही परीक्षा ८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार होती.’
फाउंडेशन पेपर १ या विषयाची परीक्षा आता रविवारी १३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. उमेदवारांना जी प्रवेशपत्रं दिलेली आहेत तीच १३ तारखेला वैध असणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
सोर्स : म. टा.