SBI CBO 2020 परीक्षेची तारीख जाहीर
Sbi CBO Exam Date Announced
SBI CBO 2020 परीक्षेची तारीख जाहीर
SBI CBO Exam: भारतीय स्टेट बँकेने उमेदवारांसाठी SBI CBO परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अधिकृत संकेतस्थळाचा पत्ता sbi.co.in/careers असा आहे.
बँकेने घोषित केल्यानुसार, सर्कल आधारित अधिकाऱ्यांसाठी ऑनलाइन परीक्षा २८ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित केली जाणार आहे.
अधिकृत सूचनेनुसार, उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी तीन पर्याय द्यावे लागणार आहेत. सर्व उमेदवार एसबीआय Career सेक्शन अंतर्गत संकेतस्थळावर वेबसाइटची लिंक पाहू शकतात. ही लिंक १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह राहणार आहे.
मुलाखत कधी?
ऑनलाइन परीक्षा आयोजित केल्यानंतर SBI CBO मुलाखतीची तारीख घोषित केली जाणार आहे. SBI CBO 2020 ऑनलाइन परीक्षेत एकूण गुणांच्या आधारे एक राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय मेरिट यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
SBI CBO Exam: पॅटर्न कसा?
– परीक्षा ऑनलाइन असेल आणि ती दोन भागात द्यावी लागेल.
– वस्तुनिष्ठ परीक्षा २०० गुणांची असेल आणि वर्णनात्मक परीक्षा ५० गुणांची असेल.
– परीक्षेचा एकूण अवधी २ तास ३० मिनिटे असेल.
– वस्तुनिष्ठ परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा होतील.