नागपूर विद्यापीठ; पीएचडीच्या नियमांमध्ये होणार बदल
Nagpur University: There will be changes in the rules of PhD
नागपूर विद्यापीठ; पीएचडीच्या नियमांमध्ये होणार बदल
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘पीएचडी’च्या अटींमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्हे आहेत. कडक नियम शिथिल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितींची लवकरच बैठक घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे पीएचडीसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ साली काढलेल्या दिशानिर्देशांवरुन विद्यापीठात २०१५ साली पीएचडीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. ‘पेट’चे दोन टप्पे सुरू झाले व त्याचा सर्वात मोठा फटका हा मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या इच्छुकांना बसला. ‘पीएचडी’साठी नोंदणीचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नियमांत बदल करण्यासाठी डॉ.आर.जी.भोयर तसेच डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगळ्या समिती तयार करण्यात आल्या. समितीचा अहवालदेखील तयार झाला व त्यात ३२ शिफारशींचा समावेश करण्यात आला होता.
मात्र कोरोना व त्यानंतर ऑनलाईन परीक्षांच्या गडबडीत ही बाब मागे पडली. गुरुवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार पीएचडी सुधारणेसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ. पेशवे, डॉ. आर. जी. भोयर, डॉ. अनंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिशानिर्देश काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोर्स:लोकमत