राज्यात डिसेंबरनंतर 25 हजार पदांची मोठी पोलिस भरती!
Big Police Recruitment In The Maharashtra State After December 2020
राज्यात डिसेंबरनंतर 25 हजार पदांची मोठी पोलिस भरती!
राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे .
राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्त
पोलिस भरतीत 33 टक्के महिलांना संधी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन
रिक्त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी
राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.-संजयकुमार, अप्पर पोलिस महासंचालक, विशेष प्रशिक्षण
राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती
महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.
मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १६०० जागा राखीव;
पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)
पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स
याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त
राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती
ठळक बाबी…
- आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया
- आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती
- कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्त झाली पदे
- भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती
- 2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्त
- डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्त पदांची राबविली जाणार नवी पदभरती
सोर्स: सकाळ
Thyankyu
Mujhe police bharti me aana hai