यंदाही बारावी प्रवेश ऑफलाइन होणार;
Twelfth admission will be offline again this year, not online
यंदाही बारावी प्रवेश ऑफलाइन होणार; ऑनलाइनचा मुहूर्त नाहीच
Many students change colleges to twelfth because they did not get admission in the college they wanted. However, since the process takes place offline, there is a lot of corruption involved. As a result, although the education department has expressed its intention to make the process online every year, no action has been taken at the government level yet. As a result
Twelfth admission will be offline again this year, not online : अकरावीत पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून अनेक विद्यार्थी बारावीत महाविद्यालय बदलतात. मात्र ही प्रक्रिया ऑफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. परिणामी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा मानस शिक्षण विभाग दरवर्षी व्यक्त करत असला तरी अद्याप या प्रक्रियेबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत. परिणामी, यंदाही हे प्रवेश ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत.
यामुळे २०२०-२१ चे बारावीचे प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर राबविण्याच्या प्रक्रियेस उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीत मुले नापास होतात किंवा काही कारणांमुळे महाविद्यालय सोडून जातात. परिणामी तेथेही बारावीसाठी काही जागा रिक्त होतात. त्यामुळे त्या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडते. अकरावी आॅनलाइनमध्ये आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून सुमारे ३० टक्के विद्यार्थी बारावीच्या या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असल्याची माहिती दरवर्षीच्या प्रवेशावरून समोर आली आहे.
ही सर्व प्रक्रिया आॅफलाइनच होत असल्यामुळे येथे अनेक आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे मागील चार वर्षांपासून ही प्रक्रिया आॅनलाइन करण्याची मागणी होत असूनही शिक्षण विभागाकडून मात्र याला केराची टोपली दाखवल्याचा आरोप शिक्षण संघटनांकडून होत आहे.
विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या ठिकाणाहून महाविद्यालय लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव घराजवळील परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, शाखा बदलणे अशा कारणांसाठी विद्यार्थ्यांना बारावीत महाविद्यालय बदलण्याची संधी मिळते. आता यामुळे महाविद्यालये बदलणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश नावालाच उरण्याची शक्यता आहे.
अकरावी प्रवेशाची गुरुवारपर्यंतची माहिती
- नोंदणी केलेले विद्यार्थी – 259348
- अर्ज पडताळणी झालेले विद्यार्थी – 214087
- पसंतीक्रम भरलेले विद्यार्थी – 84146
- अर्ज लॉक केलेले विद्यार्थी – 218531
सोर्स : लोकमत