दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
The decision of State Board of Education Regarding Students Who Could Not Pass 10th ad 12th
दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. या दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले असून, संभाव्य वेळापत्रकानुसार ही परीक्षा 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
बेरोजगारांना दिलासा! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; दुप्पट लाभ मिळणार
दहावीची परीक्षा 6 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची परीक्षा 6 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होईल. तर व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 6 ते 24 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा 1 ते 23 ऑक्टोबर तर दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्य शिक्षण विषयाची लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. बारावीची प्रात्याक्षिक, लेखी व श्रेणी परीक्षा 1 ते 29 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. संभाव्य वेळापत्रकाबाबत अभिप्राय, सूचना व दुरुस्त्या ई-मेलद्वारे 17 ऑगस्टपर्यंत [email protected] या मेलवर पाठवण्याच्या सूचना मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
दहावी-बारावी फेरपरीक्षा तत्काळ नाहीच!!
सोर्स: सकाळ