CS June परीक्षांचे वेळापत्रक जारी
CS June Exam Schedule Released
CS June Exam Schedule Released: The Institute of Company Secretaries of India (ICSI) has announced the schedule of Foundation, Executive, and Professional (CS Exam) examinations. These exams will be held in June 2021. The CS Foundation Exam will be held on June 5, 6 and the CS Executive, Professional Exam will be held from June 1 to 10. The ICSI has also reserved June 11 to 14 as an emergency.
डिसेंबरमध्ये होणारी सीएस परीक्षा या महिन्याच्या २१ ते ३० तारखेदरम्यान होणार आहे. देशभरात २६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदा ४५ केंद्रे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी संस्थेला परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करावी लागली आहे. ४५ पैकी २६ वाढीव केंद्रे राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह भुवनेश्वर, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई येथे आहेत. विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणं अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्डही जारी करण्यात आलं आहे.
CS Executive Entrance Test (CSEET) 2020-Admit Card
सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे प्रवेशपत्र जारी
CSEET 2020: Admit Card: इंन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने सीएस एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET 2020) साठी प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) जारी केले आहेत. संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ icsi.edu वर हे अॅडमिट कार्ड उमेदवारांना उपलब्ध होतील. ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, ते आपल्या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने CSEET 2020 चे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.
अधिकृत निवेदनात असे जाहीर केले आहे की उमेदवार १९ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून आपले अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. CSEET 2020 यावर्षी २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार आहे. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ही परीक्षा यंदा आपल्या घरातूनच ऑनलाइन रिमोट प्रोक्टोर्ड मोडने देणार आहेत. ‘Remote Proctored Mode’ ही एक सुरक्षितपणे ऑनलाइन मोडने परीक्षा देण्याची पद्धती आहे. या पद्धतीत ऑनलाइन परीक्षेत कोणताही गैरप्रकार किंवा चीटिंग करता येत नाही.
उमदेवार पुढे दिलेल्या लिंकच्या माध्यमातून CSEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.
CSEET 2020 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
CSEET 2020 Admit Card असे करा डाऊनलोड
– दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करा
– आता आपला रजिस्ट्रेशन क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवा.
– लॉग इन करून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
CSEET 2020 आधी १७ जुलै २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर ICSI ने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त आयसीएसआयने अर्ज करण्याची मुदतही २७ जुलैपर्यंत वाढवली.
अधिकृत माहितीनुसार, उमेदवार आपल्या घरून कोणत्याही सुरक्षित ठिकाणाहून परीक्षा द्या. परीक्षेसाठी उमेदवार लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करू शकतात. मोबाईल फोनद्वारे परीक्षा देण्याची परवानगी नाही.
ऑनलाइन टेस्टचा कॉम्प्युटरआधारित एमसीक्यूचा भाग CSEET च्या वर्तमान वेळापत्रकानुसार नाही. ऑनलाइन टेस्टचा संगणक आधारित MCQ भाग CSEET च्या सध्याच्या शेड्युलनुसार राहील. पेपर ४ हा ५० गुणांचा असेल. यात चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्यासंबंधी प्रश्न विचारले जातील. ICSI ने सांगितले आहे की लॉग इन क्रिडेंशिअल परीक्षेपूर्वी उमेदवारांना ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर पाठवले जातील.
ICSI CS Executive Entrance Test (CSEET) 2020
The Institute of Company Secretaries of India (ICSI) will conduct the Company Secretary Executive Entrance Test (CSEET) on Sunday, August 29, 2020. These entrance exams will be conducted from home. This means that candidates will not have to go to any examination center. They can take the exam from their home or from any suitable facility. The organization has taken this decision taking care to prevent corona infection.
आता घरबसल्या देता येणार सीएस परीक्षा; पॅटर्नही बदलला
या संदर्भात आयसीएसआयने परिपत्रक जारी केलं आहे . त्यात नमूद केले आहे की ‘सर्व पात्र उमेदवार लॅपटॉप किंवा डेस्कटॉपद्वारे घरातून किंवा कोणत्याही सोयीस्कर ठिकाणी ऑनलाइन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. हे लक्षात ठेवा की स्मार्टफोन (मोबाइल), टॅब्लेट सारख्या गॅझेट्सद्वारे ऑनलाइन परीक्षेत सहभागी होता येणार नाही.
पेपर पॅटर्न
या ऑनलाइन टेस्टमध्ये मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स (एमसीक्यू) विचारले जातील. वायवा घेतली जाणार नाही. ४ पेपर एकूण 50 गुणांचे असतील, ज्यामध्ये चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्यांचे प्रश्न विचारले जातील.
CLAT 2020: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट पुन्हा लांबणीवर
CSEET 2020 Paper Pattern:
कोणत्या विषयातील किती प्रश्न –
बिझनेस कम्युनिकेशन – ३५ प्रश्न – ५० गुण
लीगल अॅप्टीट्यूड अँड लॉजिकल रीजनिंग – ३५ प्रश्न – ५० गुण
इकोनॉमिक अँड बिझनेस एनवायर्नमेंट – ३५ प्रश्न – ५० गुण
चालू घडामोडी (१५ प्रश्न), प्रेझेंटेशन अँड कम्युनिकेशन स्कील (२० प्रश्न)
एकूण प्रश्न – १४०
एकूण गुण – २००
सीसीआयटी २०२० चं आयोजन आधी ७ जुलै रोजी होणार होते, परंतु करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती.
मोफत कोचिंगचा फायदा घ्या
आयसीएसआयने उमेदवारांना मोफत कोचिंग क्लासेस व क्रॅश कोर्सेसदेखील उपलब्ध करूनु दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सीएस ऑनलाइन परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांना आय.सी.एस.आय. च्या वेबसाईटद्वारे या मोफत ऑनलाईन कोर्सचा लाभ घेता येईल.
पुढील विषयांसाठी आहेत ऑनलाइन क्लासेस –
बिझनेस कम्युनिकेशन, करंट अफेयर्स, लीगल अॅप्टिट्यूड, लॉजिकल रीजनिंग, इकॉनॉमिक अँड बिझनेस एनवायर्नमेंट