अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी
Final Year Exam or Average Marks?
Coronavirus infection and lockdown have prevented many universities in the country from taking final year exams this year. Meanwhile, the matter has reached the Supreme Court after much debate over whether to take the final year exams or not. Meanwhile, the Supreme Court today adjourned the hearing till August 10.
अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण? सर्वोच्च न्यायालय आता १० ऑगस्टला करणार सुनावणी
कोरोनाचा संसर्ग फैलावत असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात यावरून बराच खल झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालाने यावर सुनावणी करताना याबाबतची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा; घेण्यावर ‘यूजीसी’ ठाम
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. मात्र यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसेच सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यूजीसीने सांगितले आहे. दरम्यान, आता या प्रकरणावरील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.