सर्वच पदांची भरती ‘एमपीएससी’तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सर्वच पदांची भरती ‘एमपीएससी’तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
All Recruitments Filled By The MPSC: Recruitment of Group B, Group C posts in Arajpatri in the state was started through the Mahapariksha portal. However, due to the high level of corruption, many deserving students did not get jobs. The bogus scorecard dummy candidate caused the scam to spread across the state. Therefore, it was demanded that the Mahapariksha portal should be closed permanently.
The Mahapariksha portal was closed after independence in the state. However, now recruitment will be done at divisional level instead of district level. A tender process is currently underway for this online portal. However, it is being demanded that the recruitment should be done directly through MPSC.
केरळच्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सर्वच पदांची ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तर्फे भरती करावी, यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय बैठक घेऊन त्याबाबत निर्णय करावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यात अराजपत्रीत गट ब, गट क पदांची भरती महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही. बोगस गुणपत्रिका डमी उमेदवार यामुळे हा घोटाळा राज्यभर गाजला. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करावे, अशी मागणी केली जात होती.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले. मात्र, आता जिल्हास्तरा ऐवजी विभागीय स्तरावर भरती केली जाणार आहे. या ऑनलाईन पोर्टलसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, ही भरती थेट ‘एमपीएससी’द्वारेच करावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, गट अ ते गट क या शासकीय पदांची भरती एमपीएससीने करण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे यासाठी त्वरीत बैठक घेऊन त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे प्रतिनिधी महेश बडे, किरण निंभोरे यांनी केली आहे.
तत्पूर्वी, एमपीएससीचे सह सचिव सुनिल औताडे यांना याबाबत विचारले असता असा कोणताही प्रस्ताव आमच्या विचाराधीन नाही, असे स्पष्ट केले आहे
सोर्स : सकाळ