MPSC वनसेवा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
MPSC वनसेवा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर
MPSC Forest Service Interview Schedule Announced: There was a demand to announce the interview schedule of the candidates who have qualified from the Forest Service Main Examination conducted by the Maharashtra Public Service Commission. Finally, on Tuesday the commission announced the interview dates of 322 eligible candidates.
Interviews will be held in Pune from July 20 to 24, in Aurangabad on July 27 and 28, in Nashik on July 30 and 31, in Mumbai on August 4 and in Nagpur on August 6 and 7. In the interview letter sent to the candidates by the commission, instructions have been given to the candidates to take necessary care while coming for the interview as there is an outbreak of corona at present.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी आयोगाने पात्र 322 उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या.
करोनामुळे या मुलाखती रखडल्या होत्या. मात्र, यूपीएससीने नागरी परीक्षांचा मुलाखतीचे सर्व वेळापत्रक जाहीर केले. मात्र, एमपीएससीने घेतलेल्या परीक्षांचा मुलाखतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पात्र उमेदवारांकडून मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आयोगाने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करून उमेदवारांना दिलासा दिला.
वेळापत्रक पुढील प्रमाणे:
- पुणे : २० जुलै ते २४ जुलै
- औरंगाबाद २७ व २८ जुलै
- नाशिक ३० व ३१ जुलै
- मुंबई ४ ऑगस्ट
- नागपूर ६ व ७ ऑगस्ट
मुलाखतीचे स्थळ, वेळ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना काय काळजी घ्यावी याबाबत उमेदवाराला पाठविल्या जाणाऱ्या पत्रात नमूद केले जाईल, असे एमपीएससीने परिपत्रकाच नमूद केले आहे