Final Year Examination On A Course Taught
Final Year Examination On A Course Taught
The government has announced to conduct the final year examinations of the universities and the universities have been instructed to conduct the examinations only on the courses taught before the implementation of the lockout. The government announced the decision to cancel the first and second year exams and hold only final year or session exams due to the prevalence of corona and layoffs. However, the final semester courses of many faculties have not been completed. After the start of the second semester this year, got a period of two to two and a half months for teaching. In the middle of March, ie from March 17, the state imposed a lockout.
शिकवलेल्या अभ्यासक्रमावरच अंतिम वर्षांची परीक्षा
विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे शासनाने जाहीर केले असून टाळेबंदी लागू होण्यापूर्वी शिकवून झालेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा घेण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा रद्द करून फक्त अंतिम वर्षांच्या किंवा सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र, अनेक विद्याशाखांचा अंतिम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. यंदा दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर जेमतेम दोन ते अडीच महिन्याचा कालावधी अध्यापनासाठी मिळाला. मार्च महिन्याच्या मध्यात म्हणजे १७ मार्चपासून राज्यात टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर महाविद्यालयांमधील अध्यापन थंडावले. आता अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. टाळेबंदीनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन तासिकांचेही प्रयोग केले. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. त्यामुळे नेमक्या परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित आणि कशा होणार असा प्रश्न उपस्थित झाला. त्या अनुषंगाने १३ मार्चपर्यंत शिकवून होणे अपेक्षित असलेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी सूचना शासनाने परीक्षांबाबत नेमलेल्या समितीने दिली आहे.
एम.फिल, पीएच.डीसाठी मुदतवाढ
पीएच.डी.चे प्रबंध किंवा एम.फिल.चे शोधनिबंध सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनाही समितीने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांची मुदत या कालावधीत किंवा येत्या काही महिन्यांत संपत असल्यास त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे प्रबंध तयार आहेत, ते जमा करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्याचा पर्यायही समितीने दिला आहे.
सोर्स : लोकसत्ता