खेळाडूंना 2 वर्षांची सवलत! राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ – Govt Job for Player relaxation in age limit
Govt Job for Player relaxation in age limit
Govt Job for Player relaxation in age limit
The state government has decided to relax the age limit for athletes by two years. The maximum age limit prescribed for sports persons has been increased from 43 to 45 as the state government has relaxed the age limit by two years. Also, it has been increased from 38 to 40 years for open category and 45 years from 43 years for backward category. Due to this decision, the doors of government jobs are still open for the candidates who have passed the upper age limit. This decision has also given relief to the players. The General Administration Department of the State Government has issued a circular in this regard on Wednesday (7th). According to this, two years of players were wasted during Corona. So the state government has taken this decision. More details of Govt Job for Player relaxation in age limit are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
खेळाडूंना 2 वर्षांची सवलत!
राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ. क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंसाठी अतिशय आनंदाची बातमी असून, राज्य सरकारने खेळाडूंना दोन वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याविषयी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ७) परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार कोरोना काळात दोन वर्षे खेळाडूंचे वाया गेले. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- राज्य सरकारच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे वाढवून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या विविध विभागांत ७५ हजार नोकर भरती केली जाणार आहे.
- या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील. म्हणजे या काळात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.
- नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना व खेळाडूंना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
- आता ४५ वर्षे वय ग्राह्य धरणार
- राज्य सरकारने कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथीलता दिल्यामुळे खेळाडूंना विहित केलेली कमाल वयोमर्यादा ४३ वरून ४५ करण्यात आली आहे.
- तसेच, खुल्या वर्गासाठी ३८ वरून ४० वर तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षांवरून ती ४५ वर्ष करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे शासकीय नोकरीची दारे अजूनही खुली आहेत.
- “या निर्णयामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या खेळाडूंनाही लाभ होईल. पात्र असलेल्या जास्तीत जास्त खेळाडूंनी या निर्णयाचा फायदा घेतला पाहिजे.”
10th,12th Sports Student Get Discount Point
दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण
Savlat Gun – concession marks for Sports Student
पुणे जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्याबाबतचे कामकाज सुलभ व्हावे याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मार्गदर्शक सूचनाही अनेकदा जारी केलेल्या आहेत. मात्र, तरीही काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्तावच दाखल केलेले नाहीत, अशी बाब उघडकीस आली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये काही खेळप्रकारात प्रथम पाच क्रमांक पर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जात असले तरीही सुधारीत शासन निर्णयामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी संधी
गेल्या महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लॉकडाऊन मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे प्रस्ताव दाखल करायचे राहून गेलेल्या शाळा व महाविद्यालयांनी प्रस्ताव स्कॅन करुन ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे. प्रस्तावात विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, शाळा सांकेतांक क्रमांक, बैठक क्रमांक, खेळ, स्तर, प्राविण्य, प्रमाणपत्र क्रमांक आदी माहिती नमूद करणे आवश्यक आहे. सर्व पात्र खेळाडूंचे प्रस्ताव एकत्रितपणे पाठवावे. प्रस्तावावरील कार्यवाहीबाबत मे नंतर कळविण्यात येणार आहे. खेळाडू विद्यार्थी सवलतीच्या गुणापासून वंचित राहिल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्त भंग कार्यवाही होईल, असा इशारा क्रीडा विभागाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी दिला आहे.
सौर्स : प्रभात
Govt Job for Player relaxation in age limit