More than 340 industries allowed in lockdown
More than 340 industries allowed in lockdown
३४० हून अधिक उद्योगांना परवानगी
Lockdown in Aurangabad : As per the news received from the resources various industries who provided the emergency services in lockdown situation. More than 340 industries will be allowed to produce the product. With the possibility that the lockdown will end after April 15, some large businesses have sent a letter to their vendors last week asking them to start production. There was a possibility that the industry would start after 21 days of lockdown. We have more than 340 small enterprises and the number of workers is in the millions. However, now the announcement of the second phase of the lockdown has created a wedge in the face of big business.
लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणारे उद्योग, संस्थांना सूट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने फार्मास्युटिकल, फूड प्रोसेसिंग, वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच त्यावर आधारित उद्योगांना परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने ज्या उद्योगांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्याची तपासणी करून नियम व अटींच्या अधीन राहून अत्यावश्यक उद्योगांन परवानगी दिली जात आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत ३४० हून अधिक उद्योगांना परवानगी दिली गेली. त्यात सप्लाय चेन प्रकारातील बहुतांश उद्योग आहेत. फार्मास्युटिकल व अन्य विभागातील या उद्योगांना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यातील किती उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत यासंदर्भात मात्र अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या औरंगाबाद परिसरातील ३४० हून अधिक उद्योगांना करोना लॉकडाऊनच्या काळात विशेष बाब म्हणून उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापैकी नेमके किती उद्योग सुरू झाले याविषयी मात्र अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याचा दुसरा टप्पा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन जाहीर करून महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगितले.
लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर संपुष्टात येईल या शक्यतेने काही मोठ्या उद्योगांनी आपापल्या व्हेंडरना गेल्या आठवड्यात मेल पाठवून उत्पादन सुरू करण्याविषयी सूचना केल्या होत्या. २१ दिवसांच्या लॉकडाऊनंतर उद्योग सुरू होतील शक्यता होती. आपल्याकडे ४५०० हून अधिक छोटे मोठे उद्योग असून कामगारांची संख्या कित्येक लाखांत आहे. मात्र, आता लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जाहीर झाल्याने मोठ्या उद्योगांसमोर पेच निर्माण झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत ३४० हून अधिक उद्योगांना परवानगी दिली आहे. आमच्याकडे यापुढेही जसे अर्ज येतील अशा अत्यावश्यक सेवेशी संबंधित उद्योगांची वैधता तपासून परवानगी दिली जाईल.
– राजेश जोशी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
सौर्स : मटा