BPharm, MPharm Exam 2020 Update
Pharmacology students enroll in the next class without exams
Pharmacology students enroll in the next class without exams
In order to prevent the loss of students in case of lock-up, the Pharmacology Council recommends that the students of pharmacology courses be admitted to the next class before taking the exam. Universities should review the situation and take the exam. However, the Council has stated that it should not harm the students’ education for this and the Council has given the opportunity to give the students two exams in the next session.
औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश
अंतिम अधिकार विद्यापीठांनाच
औषधनिर्माणशास्त्र परिषद ही अभ्यासक्रमाचे नियमन करणारी यंत्रणा असली तरी परीक्षा घेण्याचे अधिकार हे विद्यापीठांना किंवा शिक्षणसंस्थांचे आहेत. त्यामुळे परिषदेने शिफारशी केल्या असल्या तरी याबाबत अंतिम निर्णय हा विद्यापीठांचाच असणार आहे. सध्या राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन कसे करण्यात यावे याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतर राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
परीक्षा कशा घ्याव्यात?
- * पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.फार्म.) विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एम.फार्म) पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना दोन सत्रांतील किंवा दोन वर्षांच्या विषयांची परीक्षा पुढील वर्षी देण्याची मुभा मिळेल
- * अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि त्यापूर्वीच्या सर्व वर्षांतील विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय पदवी मिळणार नाही.
- * उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल नाहीत.
- * पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रकल्प किंवा शोधनिबंध आणि तोंडी परीक्षेच्या आधारे केले जाते. तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात यावी.
- * पदव्युत्तर पदवी मिळण्यासाठी आधीच्या सर्व सत्रांतील सर्व विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
* या शिफारशी सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीपुरत्या म्हणजेच एका वर्षांपुरत्या लागू राहणार आहेत.