नववी फेल ते दहावी परीक्षा योजना फायदेशीर – 1st to 9th Class all Students will pass
9th Class Fail Student to 10th exam plan beneficial – The number of students appearing for class 10 exams every year is around 22,000. This means that 8,000 to 10,000 students do not reach class 10th. Some of the students who fail in 9th Class sit in the same class again and go up to Class 10th. But the plan to give the Class 10th exam directly to students who drop out of school because they will have to sit in the classroom again has proved beneficial. Normally, only students who had failed class 10th were appearing for the exam as private candidates. A total of 500 private students had appeared for the exam last year as students who had failed class 9th also applied, said Bhagirath Shetye, chairman of the school board.
नववी फेल ते दहावी परीक्षा योजना फायदेशीर – दरवर्षी दहा हजार विद्यार्थी दहावीच्या उंबरठ्यापर्यंतच
इयत्ता नववीत नापास झालेले विद्यार्थी नंतर शिक्षण चालू ठेवण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा देण्याची संधी गोवा शालान्त मंडळाने दिल्यामुळे आता विद्यार्थ्यांची गळती होण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. दरवर्षी साधारणत: २८ ते ३० हजार विद्यार्थी इयत्ता नववीला असतात.
- यंदा नववी इयत्तेत ३० हजार विद्यार्थी होते. दरवर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ हजारांच्या आसपास असते. त्यामुळे ८ हजार ते १० हजार विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचतच नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. जे विद्यार्थी नववीला नापास होतात त्यातील काही विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसून दहावीपर्यंत जातात. परंतु पुन्हा त्यात वर्गात बसावे लागेल, म्हणून शिक्षणच सोडून देतात, अशा विद्यार्थ्यांना ही थेट दहावीची परीक्षा देण्याची योजना फायदेशीर सिद्ध झाली आहे. एरव्ही केवळ दहावीला नापास झालेले विद्यार्थीच खासगी उमेदवार म्हणून परीक्षा देत होते. नववी नापास झालेल्या विद्यार्थ्यांनीही अर्ज केल्यामुळे मागील वर्षी एकूण ५०० खासगी विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली.
- कुठे जातात हे विद्यार्थी? यंदा नववीची परीक्षा शालान्त मंडळाकडून घेतली गेली असल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्यांची संख्या शालान्त मंडळाकडे उपलब्ध आहे. यंदा एकूण ३० हजार विद्यार्थी नववीच्या परीक्षेला बसले होते. दरवर्षी हे असेच प्रमाण असते, अशी माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली; परंतु दहावीला पोहोचतात केवळ २८ हजार विद्यार्थी, मग हे सुमारे ८ हजार ते १० हजार विद्यार्थी जातात कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. काहीजण थेट आयटीआय प्रवेश वगैरे घेतात, तरी बाकीचे कुठे जातात हा प्रश्न उपस्थित होत आहे.
1st to 9th Class all Students will pass
पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार
Chhattisgarh State decided to pass all the student for class 1st to 9th. Due to the Corona Virus Chhattisgarh government has taken a major decision as the education system. Accordingly, all the students from 1st to 9th in the State will be passed and passed in the next class. The same will be done for the students of 11th. Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel has given such instructions to educational institutions in the state. Read the complete details carefully given below:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्व शैक्षणिक संस्था बंदच आहेत.
छत्तीसगढ सरकार रायपूर: Latest News Regarding the Corona Virus – कोरोना व्हायरसच्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे राज्यातील शिक्षणसंस्था बंद पडल्यामुळे छत्तीसगढ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत ढकलण्यात येईल. अकरावीतील विद्यार्थ्यांनाही अशाचप्रकारे उत्तीर्ण करण्यात येणार आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांना तसे निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकारने १९ मार्चपासून सर्व शाळा बंद केल्या होत्या. तसेच सर्व परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही सर्व शैक्षणिक संस्था बंदच आहेत. सध्याची परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सर्व परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी सरकारने पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १३९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १२४ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
सौर्स : डेलीहंट