Kreeda Prabodhini Bharti 2020
Kreeda Prabodhini Bharti 2020
क्रीडा प्रबोधनीत प्रशिक्षक भरती
Kreeda Prabodhini Recruitment 2020 : As per news published in newspaper there are various posts still not filled for Coach in various sports. Sport Department wants to recruiting the Coach posts for various sports. Shiv Chhatrapati Sports Sports is run by the sports department of the government. The coach will be recruiting for this promotion. Twenty-five guides will be selected for various sports. These include hockey, football, swimming, shooting, weightlifting, judo. For the first time, a large number of coaches are recruiting, which will boost the development of budding players. Read the more details carefully given below:
Sports Department recruitment 2020
शासनाच्या क्रीडा विभागातर्फे शिवछत्रपती क्रीडा प्रबोधनी चालविली जाते. या प्रबोधनीसाठी प्रशिक्षक भरती होणार आहे. तब्बल 25 मार्गदर्शकांना विविध खेळासाठी निवडले जाणार आहेत. यात हॉकी, फुटबॉल, जलतरण, शुटींग, वेटलिफ्टिंग, ज्युदो या खेळांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षकांची भरती होत असल्याने नवोदित खेळाडूंच्या विकासाला चालना मिळणार आहे.
शासनाच्या क्रीडा विभागातर्फे शिवछत्रपती क्रीडा प्रबोधनी चालविली जाते. या प्रबोधनीसाठी प्रशिक्षक भरती होणार आहे. तब्बल 25 मार्गदर्शकांना विविध खेळासाठी निवडले जाणार आहेत. यात हॉकी, फुटबॉल, जलतरण, शुटींग, वेटलिफ्टिंग, ज्युदो या खेळांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षकांची भरती होत असल्याने नवोदित खेळाडूंच्या विकासाला चालना मिळणार आहे.
प्रबोधनीकडे वाढणाऱ्या खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन प्रशिक्षकांची संख्याही वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय क्रीडा विभागाच्या आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला आहे. त्यामुळे तब्बल 25 क्रीडा प्रशिक्षक आणि सहाय्यक मार्गदर्शक यांची भरती करण्यासाठी जाहीरात काढण्यात आली आहे. यात हॉकी, फुटबॉल, जलतरणसाठी प्रत्येकी दोन तर सायकलींग, शुटींग, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारासाठी प्रत्येकी एक असे आठ क्रीडा प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. हॉकी, फुटबॉल, जलतरण, सायकलींग, शुटींग, वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स, ज्युदो या खेळाकरीता प्रत्येकी एक असे दहा सहाय्यक मार्गदर्शक देखील निवडले जाणार आहेत.
क्रीडा प्रशिक्षक आणि मार्गदर्शकासाठी एन. आय. एस. डिप्लोमा किंवा अर्जून, द्रोणाचार्य पुरस्कार किंवा राज्य शासनाचा उत्कृष्ठ मार्गदर्शक असण्याची अट आहे. क्रीडा प्रशिक्षकाला 35 हजार, तर मार्गदर्शकाला 15 हजार रूपयांचे मासिक मानधन दिले जाणार आहे.
प्रबोधनी प्रशिक्षणाला बळ
प्रबोधनीतील प्रशिक्षकांची संख्या वाढविण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी सपोर्टींग स्टाफही वाढविला जात आहे. यंदा चार फिजोओथेरपिस्ट, दोन स्पोर्टंस सायकॉलॉजिस्ट, एक आहार सल्लागार आणि दोन वैद्यकीय अधिकारी नेमले जाणार आहेत. यामुळे प्रबोधनीतील प्रशिक्षणाला अधिक बळ मिळणार आहे.
सौर्स : सकाळ