CBSE Exam 2021-विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवता येणार
CBSE Term 1 Results
Central Board of Secondary Education (CBSE) Term 1 Board Examinations are underway. Meanwhile, the CBSE Board has issued important instructions regarding CBSE Term 1 Class X and XII Board Examinations. According to the CBSE Board’s circular, necessary information has been given regarding the evaluation of answer sheets, question papers and OMR sheets of Term 1 examination. Relevant circulars can be viewed on the official website of the Board cbse.gov.in.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) टर्म 1 बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान, सीबीएसई टर्म १ इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबत सीबीएसई बोर्डाने महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परिपत्रकानुसार, टर्म १ परीक्षेची उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीटच्या मूल्यांकनाबाबत आवश्यक माहिती देण्यात आली आहे. बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर संबंधित परिपत्रक पाहता येणार आहेत.
सीबीएसईच्या परीपत्रकानुसार दहावी आणि बारावी टर्म १ बोर्डाच्या परीक्षा बदललेल्या नियमांद्वारे घेतल्या जात आहेत. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात असून विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरे ओएमआर शीटवर भरायची आहेत. परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी या ओएमआर गुणपत्रिकांचे मूल्यमापनही केले जात आहे. हे मूल्यमापन सीबीएसईने जाहीर केलेल्या उत्तरतालिकेच्या आधारे केले जात आहे. असे असले तरीही प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या उत्तरात काही चूक होण्याची शक्यता असते. मात्र या चुका सुधारण्यासाठी देखील बोर्डाने यंत्रणा तयार केली आहे.
अशी करा दुरुस्ती
सीबीएसईने नवीन परिपत्रकात दिलेल्या माहिती कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात किंवा उत्तर-कीच्या उत्तरात काही चूक असल्यास, परीक्षा संपल्यानंतर लगेच बोर्डाला कळवा. विषयातील तज्ञांनी तपासलेल्या प्रश्नपत्रिका (CBSE Term 1 Question Paper) किंवा उत्तरतालिका (CBSE Term 1 AnswerKey) वर नोंदवलेले आक्षेप बोर्डाला कळू शकतील. यानंतर त्वरीत चुका सुधारल्या जातील आणि त्यानंतर निकाल तयार होईल.
प्रश्नपत्रिकेत काही चूक असल्यास किंवा कोणतेही उत्तर चुकीचे दिले असल्यास विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या आवडीनुसार उत्तर देऊ शकतात. पेपर तपासणीस त्यांना मिळालेल्या उत्तरतालिकेनुसार ओएमआर शीट तपासतील. या तपासणीवेळी चूक सिद्ध झाल्यास, त्या प्रश्न किंवा उत्तरासाठी विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
Tenth Class Term 1 Paper from CBSE Board has started on 30th November. The Social Science (SST) subject was examined first. The exam started at 11.30 am and ended at 1 pm. Candidates appearing for this examination can check the answer sheet by visiting the official website cbseacademic.nic.in.
CBSE Class 10 Answer Key 2021-22 : सीबीएसई बोर्डाकडून दहावी वर्ग टर्म १ पेपर ३० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. सर्व प्रथम सामाजिक शास्त्र (SST) विषयाची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा सकाळी ११.३० वाजता सुरू होऊन दुपारी १ वाजता संपली. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू शकतात.
या परीक्षेनंतर उत्तरतालिका पीडीएफ किंवा व्हिडिओ स्वरूपात जाहीर केली जाते. सीबीएसई एसएसटी विषयाची परीक्षा संपली आहे. त्यानंतर सीबीएसईतर्फे दहावीच्या एसएसटी विषयाची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. गुण मोजताना सीबीएसई बोर्डाने दिलेल्या मार्किंग स्कीमनुसार बरोबर उत्तरासाठी गुण जोडावे लागतील.
उत्तरतालिका अशी तपासा
- सर्वप्रथम सीबीएसई cbseacademic.nic.inच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- होमपेजवरील प्रश्नपत्रिका टॅबवर जा.
- सीबीएसई दहावीची सामाजिक विज्ञान प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका शोधा.
- सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ ची उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असेल.
- सीबीएसई इयत्ता दहावी सामाजिक विज्ञान टर्म १ उत्तरतालिका २०२१-२२’ डाउनलोड करा.
- भविष्यातील उपयोगासाठी सीबीएसई वर्ग दहावीची उत्तरतालिका २०२१-२२ ची प्रिंटआउट घ्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
CBSE Result: सीबीएसई बोर्डाचा दहावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर
The result of the supplementary examination for class X conducted by the Central Board of Secondary Education has been announced. The CBSE Board has released the results of CBSE Class X compartment examinations on September 30 on the official websites cbseresults.nic.in and cbse.gov.in.
ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, ते वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. यावर्षी एकूण १७,६३६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. दहावी निकालाची उत्तीर्णता ९९.०४ टक्के आहे. मागील वर्षी एकूण ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
CBSE class 10 result 2021
CBSE 10th Result 2021: Central Board of Secondary Education (CBSE) X results will be announced on Tuesday, August 3 at 12 noon. The board has made an official announcement in a tweet. Students can view the results on the website cbseresults.nic.in
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी देशभरातून नोंदणी केली होती. निकालाची लिंक बोर्डाने अॅक्टिव्ह केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहता येणार आहे. रोल नंबर माहित नसल्यास तो कसा मिळवावा, हे या वृत्तात पुढे देण्यात आले आहे.
CBSE 10th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल 3 ऑगस्ट, मंगळवारी दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. बोर्डाने ट्विट करत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. cbseresults.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतात. बैठक क्रमांक आणि अन्य माहिती टाकून आपला निकाल पाहू शकतात, आणि डाऊनलोडही करु शकतात. ज्या विद्यार्थांना आपला बैठक क्रमांक माहित नाही ते cbseresults.nic.in या संकेतस्थळावर शोधू शकतात.
सीबीएसईचा निकाल cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. दहावीच्या निकालानंतर या लिंकवर निकाल उपलब्ध होणार आहे.
सीबीएसईच्या दहावीच्या निकालासाठी आणखी लिंक
https://testservices.nic.in/class10/class10th21.htm
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या सत्राच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला होता. त्यामुळे विद्यार्थांचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलेलं नव्हतं. बैठक क्रमांकासाठी बोर्डाने एक संकेतस्थळ सुरु केलं आहे. यावर विद्यार्थी आपला बैठक क्रमांक माहिती करुन घेऊ शकतात. https://cbseit.in/cbse/2021/rfinder/RollDetails.aspx या संकेतस्थळावर जावा. तिथे दिलेल्या माहितीची पुर्तता करा. त्यानंतर तुमचा बैठक क्रमांक येईल.
The Central Board of Secondary Education (CBSE) XII results will be announced and now the CBSE X results will be announced. The CBSE Board can now announce the date and time of the 10th result. Students who had registered for the 10th exam can view the results on the official website cbse.gov.in and cbseresults.nic.in.
सीबीएसई दहावीचा निकाल २०२१ निकालाची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थी आपला रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर महत्वाची माहिती टाइप करुन आपला रिझल्ट पाहू शकतात. यासाठी रोल नंबर कसा मिळवायचा याची माहिती घेऊया.
CBSE 10th Roll Number: असा करा डाऊनलोड- How to Download CBSE 10th Results
- स्टेप १ – सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा
- स्टेप २- होमपेजवर स्क्रोल करा ‘Roll Number Finder 2021’ लिंकवर क्लिक करा
- स्टेप ३ – सर्व ऑप्शन सिलेक्ट करा पुढच्या पेजसाठी ‘Continue’ वर क्लिक करा
- स्टेप ४ – दहावीचा पर्याय निवडा आणि मागितलेली माहिती भरा. आपले नाव, आई-वडिलांचे नाव, जन्म तारीख अपडेट करा
- स्टेप ५- स्क्रीनवर सर्च डेटावर क्लिक केल्यावर रोल नंबर समोर येईल
- स्टेप ६ – डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट काढून ठेवा
सीबीएसई दहावीचा निकाल केव्हा ?
सीबीएसई दहावीचा निकाल २० जुलैला येण्याची शक्यता होती. त्यानंतर सीबीएसई दहावीचा निकाल ३१ जुलैला जाहीर होईल अशी शक्यता होती. कारण सर्वोच्च न्यायालयाने सर्व राष्ट्रीय आणि राज्य बोर्डांना तसे निर्देश दिले होते. अनेक राज्य बोर्डांनी बारावी सोबतच दहावीचा निकालही जाहीर केला आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डातर्फे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सीबीएसई दहावीचा रोल नंबर मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
CBSE X results are expected to be announced tomorrow. The CBSE will abide by the date given by the Supreme Court. The results have been completed and the results can be announced any day today or tomorrow.
CBSE Board 10th Result 2021:. सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ ची घोषणा उद्या २९ जुलै २०२१ ला केली जाण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या समितीमध्ये असलेल्या एका शाळेच्या प्रिंसिपलकडून ही माहिती मिळाली आहे. एका प्रिंट मीडियाला त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाची वेळ ठरली आहे. सीबीएसई निकाल तयार झाले आहेत. रिझल्टची घोषणा करण्याच्या तयारीसाठी दिवस रात्र एक करुन काम केले जात आहे. दहावीच्या निकालाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
The assessment of 10th standard students is underway and the results will be announced soon. According to media reports, The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of Class X on July 20
CBSE Board Exam- CBSE १०वी आणि १२ वीच्या रिझल्ट संदर्भात अपडेट
CBSE Board 10th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सेकेंडरी बोर्डाची परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने सीबीएसई बोर्ड दहावीच्या रिझल्ट २०२१ ची घोषणा केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टमधील वृत्तानुसार दहावी रिझल्ट २०२१ ची घोषणा २० जुलैपर्यंत केली जाणार आहे. पण बोर्डाकडून अधिकृतरित्या याची घोषणा झाली नाही. आधीच्या वर्षांप्रमाणे यावर्षी देखील दहावी रिझल्टची घोषणा रिझल्ट पोर्टल cbseresults.nic.in वर केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड दहावी रिझल्ट २०२१ अपडेटसाठी रिझल्टची वेबसाइट पाहणे गरजेचे आहे.
CBSE Result 2021: असा तपासा निकाल- How to Check 10th CBSE Results
- CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याचा रोल नंबर, नाव आणि जन्मतारखेच्या सहाय्याने ऑनलाइन मिळवता येईल.
- – उमेदवारांना वर दिलेल्या संकेतस्थळांवर लॉग इन करावे लागेल, निकालाच्या पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरावी लागेल.
- – CBSE इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ३०:३०:४० सूत्रावर आधारलेला असेल. विद्यार्थ्यांचे बारावीतले अंतर्गत मूल्यमापन, अकरावीच्या अंतिम परीक्षेतील गुण आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेतील सर्वोत्तम तीन विषयांचे गुण यावर आधारित निकाल तयार करण्यात येईल.
- – CBSE इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन, शालेय स्तरावरील विविध परीक्षांमधील कामगिरी यावर आधारलेला असेल.
The assessment of 10th standard students is underway and the results will be announced soon. The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the results of Class X on July 20. With a week to go before the verdict, it is likely to be delayed for some reason.
CBSE 10th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसई (Central Board of Secondary Education, CBSE) ने दहावीचा निकाल २० जुलैला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. पण नव्या माहितीनुसार या निकालाची घोषणा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टमधील वृत्तानुसार सीबीएसई दहावी निकालास उशीर लागू शकतो. यामागे दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे रिझल्ट तयार करण्यासाठी टॅब्युलेशन पॉलिसी तयार करण्यात आली आणि दिल्ली हायकोर्टमध्ये निकालाच्या पद्धतीबद्दल याचिका दाखल होणे हे दुसरे कारण असू शकते.
टॅब्युलेशन पॉलिसीवर अनेक शाळांनी नाराजी दर्शविली आहे. शाळा यापेक्षा सोयीस्कर मॉडरेशन पद्धतीच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय सीबीएसई दहावी रिझल्ट पॉलिसीचा आव्हान देत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. जर हायकोर्टाने ही याचिका स्वीकारली तर बोर्डाचे निकाल घोषित होण्याच्या तारखेला उशीर होऊ शकतो. कोर्टाच्या प्रक्रियेत वेळ जाऊन सुनावणीस वेळ जाऊन पर्यायाने निकालस उशीर होऊ शकतो.
The Central Board of Secondary Education (CBSE) board’s 10th result is expected to end this month. The CBSE has completed the tabulation process for announcing the results of the 10th.It is expected that the result of the 10th will be available by July 15, 2021.
CBSE Class 10 Result 2021 Date: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा या महिन्यात संपणार आहे. सीबीएसईने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी टॅब्युलेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. शाळांनी दिलेल्या मापदंडांनुसार त्यांनी विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाकडे जमा केले आहेत. एकदा अंतिम स्वरुप दिल्यावर निकाल cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर अपलोड केला जाईल.
१५ जुलै पूर्वी देखील जाहीर होऊ शकतो निकाल
बोर्डाने दहावी निकाल २०२१ जाहीर करण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. म्हणून अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे की बोर्ड १५ जुलै पूर्वी देखील निकाल जाहीर करू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी अद्ययावत माहितीसाठी cbse.gov.in ला नियमितपणे भेट देत राहावी.
CBSE has issued FAQ regarding X results and marking scheme. A total of 57 questions have been answered to explain how the marks will be given to the students. CBSE has issued FAQ on its official website cbse.nic.in.
CBSE class 10 marking policy 2021: सीबीएसई दहावीचा निकाल (CBSE 10th result date) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षेशिवाय कसा लावणार निकाल, याबाबत बोर्डाने यापूर्वीच सांगितले. पण या गुणांकन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आहे. स्टूडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्सचा गोंधळ दूर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी परीक्षेसंबंधी फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चंस (FAQ) जारी केले आहेत.
सीबीएसईने आपल्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर एफएक्यू जारी केले आहे. यात एकूण ५७ प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत. हे असे प्रश्न आहेत, जे सर्वसामान्यपणे विद्यार्थी-पालकांकडून विचारले जात आहेत.
CBSE 10th Evaluation Process 2021:
Many CBSE board X students could not appear for the pre-board exams or in-school exams this year. How will such students be assessed? The Central Board of Secondary Education (CBSE) Class X Result (CBSE 10th Result 2021) is being prepared on the basis of internal assessment and pre-board examination.
CBSE 10th board assessment process 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल (CBSE 10th Result 2021) इंटरनल असेसमेंट आणि प्री-बोर्ड परीक्षेच्या आधारे तयार केला जात आहे. पण अनेक शाळांमध्ये अशी अडचण येत आहे की अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत घेतलेली चाचणी परीक्षा किंवा प्रिलिम्स दिल्या नव्हत्या. अनेक शाळांमध्ये सर्व विषयांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन (CBSE 10th evaluation 2021) कसे केले जावे, याबाबतचे निर्देशही सीबीएसई बोर्डाने जारी केले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व संलग्न शाळांना त्यांची निकाल समिती तयार करण्यास सांगितले आहे. इंटरनल असेसमेंट न झालेली असल्यास किंवा कुठल्या चाचणीत विद्यार्थी सहभागी झाले नसतील तर अशा वेळी ही समिती त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी फॉर्म्युले आणि मापदंड तयार करेल. त्यांचे मूल्यांकन एकूण ८० गुणांसाठी करण्यात येईल.
जे विद्यार्थी संपूर्ण वर्षात जर एखाद्या विषयाची एकही परीक्षा देऊ शकले नसतील तर त्यांचे मूल्यांकन फोन कॉल वर केले जाईल. सोबतच शाळांना मूल्यांकन करताना बोर्डाला संबंधित कागदपत्रे सप्रमाण सादर करावयाची आहेत.
CBSE Board Exam Results
The CBSE board has started preparations for the 10th result. The board has activated a link on the e-exam portal. Each school has been instructed to appoint a seven-member results committee.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डांतर्गत येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल (CBSE 10th Result 2021) जाहीर करण्यात येणार आहेत. या निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या विविध ऑनलाइन परीक्षा प्रकारांसाठी विशिष्ट गुण नमूद करण्यात आले आहेत.
सीबीएसईचा मूल्यमापन आराखडा दृष्टिक्षेपात
- १. निकालासाठी प्रत्येक शाळेची सात शिक्षकांची समिती
- २. सातपैकी दोन शिक्षक इतर शाळांमधील असणे बंधनकारक
- ३. मू्ल्यमापन करताना चाचणीला १०, सहामाहीला ३० तर पूर्व परीक्षेला ४० मार्कांचा अधिकतम दर्जा
- ४. एकूण ८० गुणांचे मूल्यमापन
The Central Board of Secondary Education (CBSE) has announced that the results will be announced after an internal evaluation of the 10th standard students. The results will be announced by June 20 after the completion of the assessment in May.
CBSE दहावीच्या परीक्षेचा निकाल या तारखेला होणार जाहीर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने निकष जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत अंतर्गत मूल्यांकन करून त्या आधारावर दहावीचे निकाल दिले जाणार आहेत.
20 जूनपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे नियोजन CBSE कडून करण्यात आले आहे. देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मे महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 20 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे शाळेत मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन केली जाणार असून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
असे असेल 80 गुणांचे विभाजन
- चाचणी परीक्षा- 10 गुण
- सहामाही परीक्षा- 30 गुण
- सराव परीक्षा- 40 गुण
CBSE Board 10th, 12th Exam 2020
सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा शनिवारपासून
CBSE Exam 2020 : CBSE Board 10th Exam 2020 and CBSE Board 12th Exam 2020 will be started from 15th February 2020 and CBSE Board 10th Exam 2020 will be ended on 20th February 2020. and CBSE Board 12th Exam 2020 will be ended on 30th March 2020. Complete details regarding CBSE Examin 2020 are given same time table of CBSE examine 10th and 12th are also given below:
CBSE Exam 2020 :
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा शनिवारी १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च तर बारावीची परीक्षा ३० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यावर्षीपासून मुलांच्या निकालावर Fail किंवा कंपार्टमेंट हा शब्द न लिहिण्यावर विचार सुरू आहे. जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होतात, त्यांना कंपार्टमेंटल परीक्षा द्यावी लागते. पण यापुढे निकालावर तसे नमूद करण्याचा विचार बोर्ड करत आहे. दरम्यान, शनिवारी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ते पाहा…
परीक्षेला जाण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या :
> हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड विसरू नका.
> परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेआधी ३० ते ४० मिनिटे अगोदर पोहोचा.
> परीक्षा केंद्रावर आपल्या जागेवर बसण्यापूर्वी आजूबाजूला कोणता कागदाचा तुकडा वगैरे तर नाही ना पडला हे नीट तपासून घ्या.
> इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.
> हॉल तिकिटाची एक फोटोकॉपी घरी जरूर ठेवा.
————
सीबीएसईच्या अध्यक्षांचं मुलांना भावुक पत्र
मागील वर्षी कसा होता निकाल?
सीबीएसई दहावी – २०१९ मध्ये सीबीएसई दहावीत ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
एकूण १८,२७,४७२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
सीबीएसई बारावी – २०१९ मध्ये सीबीएसई बारावीत ८३.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक : CBSE Time Table 2020
सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक येथे पाहा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या शनिवारपासून १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत आहे. तथापि, त्यापूर्वी सकाळी १० ते रात्री १०:१५ या वेळेत परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. तर, सकाळी १०.१५ ते १०:३० दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे.
- सीबीएसई बारावीचं वेळापत्रक येथे पहा CBSE 12th Time table
- सीबीएसई दहावी परीक्षेचं वेळापत्रक येथे पहा CBSE 10th Time Table
दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा शनिवार १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई दहावीचा शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र असून तो १८ मार्चला आहे. बारावीचा शेवटचा पेपर सोशलॉजी विषयाचा असून तो ३० मार्चला आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड (हॉल तिकीट) देण्यात आले आहेत. त्यांनी अधिक परीक्षेसंदर्भातली अधिक माहितीसाठी शाळांना संपर्क करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे.