सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या दाव्यावर निर्णय घ्या! – BAMU Professor Recruitment Process
BAMU Professor Recruitment Process
As per the latest news The joint director of higher education should consider the proposal for promotion of Assistant Professors to the post of Associate Professor within six weeks on merit. Also, the decision to claim a promotion, a Ph.D. for promotion. The Aurangabad bench of the Bombay High Court said that the 2018 rules have been implemented by the state government and the 2019 government order will not be applicable. Mangesh Patil and Justice Shailesh P. Given by Brahme.
The petitioners had sought promotion to the post of associate professor. The university then formed an evaluation committee. The committee verified his claim and recommended his promotion. When the proposal went to the Deputy Director of Education, he applied for a Ph.D. His proposal was rejected, saying he was not a graduate. The above-mentioned professors then approached the bench and filed an appeal. Ph.D. by the Department of Education and the University Grants Commission. Qualification is necessary, he argued, and ph.d. The court brought to the notice of the court the 2018 Government Rules and the 2019 Government Resolution (GR) that the state government had implemented the rule.
सहायक प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या दाव्यावर निर्णय घ्या!
छत्रपती संभाजीनगर : उच्चशिक्षण सहसंचालकांनी सहाय्यक प्राध्यापकांच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरील पदोन्नतीसाठीच्या प्रस्तावावर गुणवत्तेनुसार सहा आठवड्यांत विचार करावा. तसेच पदोन्नतीच्या दाव्याच्या निर्णयाला, पदोन्नतीसाठी पीएच.डी. आवश्यक असल्याचे सांगणारे २०१८ चे नियम राज्य शासनाने लागू केल्याचा तसेच २०१९ चा शासनादेश लागू असणार नाही, अशा आशयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश पी. ब्रह्मे यांनी दिले आहेत.
केशरबाई क्षीरसागर महाविद्यालय बीड, सोळुंके महाविद्यालय माजलगाव, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड, पंडितगुरू पर्डिकर महाविद्यालय सिरसाळा, सिद्धार्थ महाविद्यालय जालना येथील सहायक प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब पोटे, श्रीनिवास मोतेकर, विजयमाला घुगे, विशाल नाईकनवरे, विक्रम धानवे आणि मदन मगरे यांनी अॅड. अनुज फुलपगर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. ज्येष्ठ विधिज्ञ पी. आर. कातनेश्वरकर यांनी याचिकाकर्त्यांनी बाजू मांडली. याप्रकरणी राज्य शासन, शिक्षण संचालक, उपसंचालक आदींतर्फे एस. पी. जोशी यांनी तर विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे अॅड. एस डब्ल्यु मुंडे यांनी काम पाहिले.
याचिकाकर्त्यांनी आपल्याला सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नती मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर विद्यापीठाने मूल्यमापन समिती गठीत केली. या समितीने त्यांच्या दाव्याची पडताळणी करून त्यांच्या पदोन्नतीची शिफारस केली. हे प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे गेले असता त्यांनी अर्जदार पीएच.डी. पदवीधारक नसल्याचे सांगत त्यांचे प्रस्ताव फेटाळले. त्यानंतर उपरोक्त प्राध्यापकांनी खंडपीठात धाव घेऊन दाद मागितली. शिक्षण विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. अर्हता आवश्यकच आहे, असे म्हणणे मांडले आणि पीएच.डी. आवश्यक असल्याचा २०१८ चा शासन नियम आणि हा नियम राज्य शासनाने लागू केल्याचा २०१९ चा शासन निर्णय (जीआर) न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती लवकर होईल
BAMU Recruitment 2020 : As per the news the Education institutions and other entities across the state are required to go to the ministry in Mumbai for administrative work. One file does not reach the minister for several months. To overcome this problem, the university administration and the ministry administration will go to each district to settle cases. The project will start from Gadchiroli district, said Minister of Higher and Technical Education, Uday Samant. Recruitment of the professor will be done soon as the point-blank is made. Out of the 3 thousand 580 Posts of approved professors for the colleges, 1128 Posts have been filled. The Vice President was suddenly given the right to recruit under the President’s rule. Why the Secretary’s right was handed over to the JD, is unimaginable, ” said Samant.
BAMU Recruitment 2020 शिक्षण विभाग भरवणार ‘जनता दरबार’
राज्यभरातील शिक्षण संस्था आणि इतर घटकांना प्रशासकीय कामकाजासाठी मुंबईला मंत्रालयात जाणे जिकिरीचे असते. एक फाइल अनेक महिने मंत्र्यापर्यंत पोहचत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि मंत्रालय प्रशासन प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रकरणे निकाली काढणार आहे. गडचिरोली जिल्ह्यापासून उपक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सार्वजनिक कार्यक्रमासाठी आलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती सामंत यांनी दिली. ‘दूरच्या जिल्ह्यातील शिक्षण संस्था आणि व्यक्तींना प्रशासकीय कामासाठी मुंबईला हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे विभागाबाबत नाराजी आहे. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी जनता दरबारच्या धर्तीवर जिल्हानिहाय कामकाज करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यापासून उपक्रम सुरू होईल. विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित जिल्ह्यात जाऊन प्रकरणे निकाली काढणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात शिबिर घेतले जाईल. पुढील सहा महिन्यानंतर आढावा घेण्यात येणार आहे. बिंदूनामावली तयार झाल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक भरती लवकर होईल. महाविद्यालयांसाठी मंजूर प्राध्यापकांच्या तीन हजार ५८० जागांपैकी ११२८ जागा भरल्या आहेत. राष्ट्रपती राजवटीत भरतीचे अधिकार अचानक सहसंचालकांना देण्यात आले होते. सचिवांचे अधिकार काढून ‘जेडी’ला का दिले हे अनाकलनीय आहे, असे सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठांचा खर्च आणि इतर महत्त्वाचे निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित असतात. त्यावर विचारलेल्या प्रश्नांना सभागृहात उत्तर द्यावे लागते. म्हणून खर्च आणि कामाची माहिती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाला पत्र दिले होते. हा विद्यापीठाच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न नव्हता. तरीसुद्धा माझ्यावर टीका करण्यात आली, असे सामंत म्हणाले. राजकारण विरहीत संस्था चालवण्याची गरज आहे. राजकारण नक्की कुठे करायचे ते ठरवावे लागेल, असे सामंत म्हणाले. गुणपत्रिकेवर ग्रेडसह टक्केवारी देण्याचा निर्णय नुकताच घेतल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी भरती आणि इतर निर्णयासाठी पंधरा दिवसानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.
संतपीठाला तत्वत: मान्यता
येत्या शैक्षणिक वर्षांपासून पैठणला संतपीठ सुरू करण्यात येणार आहे. संतपीठाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. डॉ. बाबासासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत संतपीठ कार्यरत राहणार आहे. अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात समिती अहवाल देणार आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेले संतपीठ कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
करोनाची खबरदारी
राज्यात करोना साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्वात अगोदर परिपत्रक काढले होते. येत्या २५ मार्चपर्यंत स्नेहसंमेलने, कार्यक्रम, परिषदा पुढे ढकलण्याची सूचना केली आहे. मागील १५ दिवसांपासून विद्यापीठातील कर्मचारी काळजी घेत आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली.
सौर्स : मटा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नियुक्ती प्रक्रिया सुरू
BAMU Recruitment 2019 : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University has started the process of appointing Professors on the basis of ‘CHB’. For the first time 263 posts will be filled in a central manner. Candidates will be appointed according to point names and academic qualifications, the university administration has stated. Online applications have been requested on official website. Masters Degree, Net-Set, Ph. D. Interviews will be held from December 6 to 9 to verify these academic qualifications. The administration has stated that there will be appointments for the current academic session, which is till April 1, 2020. Read the details carefully and keep visit us.
Aurangabad University Bharti 2019
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सीएचबी’ तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथमच केंद्रीय पद्धतीने २६३ पदे भरली जाणार आहेत. बिंदूनामावली आणि शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवार नियुक्त करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेमुळे विभागातील वशिलेबाजीला चाप लागणार आहे.
विद्यापीठाच्या विविध विभागातील रिक्त जागांमुळे शैक्षणिक नियोजन कोलमडले आहे. पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे पहिल्या शैक्षणिक सत्रासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची (सीएचबी) नियुक्ती प्रक्रिया संबंधित विभागप्रमुखांनी केली होती. या प्रक्रियेत पारदर्शीपणा नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय पद्धतीने सीएचबी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला होता. दुसऱ्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बिंदूनामावली आणि शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबत विद्यापीठाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पदव्युत्तर पात्रता, नेट-सेट, पीएच. डी. या शैक्षणिक अर्हता पडताळून सहा ते नऊ डिसेंबर या कालावधीत मुलाखत प्रक्रिया होणार आहे. चालू शैक्षणिक सत्रासाठी म्हणजे ३० एप्रिल २०२० पर्यंत नियुक्त्या असतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये २२६ आणि उस्मानाबाद उपकेंद्रात ३७ अशी २६३ ‘सीएचबी’ पदे भरली जाणार आहेत. बिंदूनामावलीनुसार ३००पेक्षा जास्त जागा भरणार असल्याचे कुलगुरू येवले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. गेल्या सत्रात ‘यूजीसी’चे नियम आणि अर्हता डावलून काही विभागात नियुक्त्या झाल्याचे उघड झाले होते. शैक्षणिक अर्हता नसताना शिकवण्याची संधी देण्यात आली. मुद्रण तंत्रज्ञान, योगशास्त्र विभागात मुलाखत न घेता नियुक्त्या केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते. या तक्रारी वाढल्यानंतर विद्यापीठ प्रथमच केंद्रीय पद्धतीने ‘सीएचबी’ नियुक्त्या करणार आहे. गुणवत्ता असलेले उमेदवार नियुक्त करुन तासिका सुरळीत करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
उपकेंद्रातही भरती
विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातही तासिका तत्त्वावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. व्यवस्थापनशास्त्र (०८), गणित (०२), भौतिकशास्त्र (02), जल व भूमी व्यवस्थापन (०३), बायोटेक्नॉलॉजी (०४), मायक्रोबायोलॉजी (०३), रसायनशास्त्र (०५), लोककला व नृत्य (०२), शिक्षणशास्त्र (०२), इंग्रजी (०१) आणि बायो-केमिस्ट्री (०५) या विषयांची पदे भरली जाणार आहेत. विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणेच उपकेंद्राची भरती प्रक्रिया होणार आहे.
BAMU Aurangabad Vacant Seat / विद्यापीठात रिक्त जागा
विभाग = पदसंख्या
वनस्पतीशास्त्र =१३
रसायनशास्त्र =१६
पर्यावरणशास्त्र =०२
नाट्यशास्त्र = ०५
वृत्तपत्रविद्या = २०
ग्रंथालयशास्त्र = ०३
गणित = ०२
फाइन आर्टस =१०
शारिरीक शिक्षण = ०७
भौतिकशास्त्र = ०२
मुद्रण तंत्रज्ञान = ०८
मानसशास्त्र = ०८
संस्कृत = ०२
उर्दू = ०२
योगशास्त्र = ०४
गोपीनाथराव मुंडे संशोधन केंद्र = २०
फुले-आंबेडकर विचारधारा = ०२
पाली आणि बुद्धिझम = ०४
ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र = ०२
राज्यशास्त्र = ०३
सांख्यिकी = ०२
पर्यटनशास्त्र = ०३
पुरातत्त्वशास्त्र = १४
दीनदयाल उपाध्याय केंद्र = २५
इलेक्ट्रॉनिक्स = ०७
भूगोल = ०२
प्री-आयएएस सेंटर = १२
विधी = ०२
व्यवस्थापनशास्त्र = १४
संगीत = ०५
बायोकेमिस्ट्री = ०५
म. टा.