जिल्हा बॅंकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर; 20 दिवस उलटूनही संपावर तोडगा नाही – District Bank Bharti

Nashik District Central Cooperative Bank Bharti 2024

Nashik District Central Cooperative Bank Bharti new update – NDCC Bank Bharti 2024 – More than 372 temporary (contractual) employees of Nashik District Central Co-operative Bank have been on strike since April 6 to press for various demands. The main demands of the employees are to retain temporary employees, increase salaries, implement mediclaim facilities, and apply leave and facilities to contractual employees like regular employees. Even after 20 days of going on strike, the district bank administration has not found a solution.  More details of District Bank Recruitment 2024 are given below.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The employees have become aggressive as the bank has issued notices to these employees without finding a solution. The district bank’s board of directors implemented a staff recruitment process in 2016. The board of directors had also passed a resolution to retain these employees. However, the recruitment was mired in controversy as the rules of the cooperative department were not followed while recruiting these employees.

जिल्हा बॅंकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर; 20 दिवस उलटूनही संपावर तोडगा नाही

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तात्पुरत्या (कंत्राटी) ३७२ हून अधिक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ६ एप्रिलपासून संप पुकारला आहे. तात्पुरत्या सेवकांना कायम करावे, वेतनवाढ द्यावी, मेडिक्लेम सुविधा लागू करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही रजा व सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. संपावर जाऊन २० दिवसांचा कालावधी उलटूनदेखील जिल्हा बॅंक प्रशासनाकडून यावर तोडगा काढण्यात आलेला नाही.

  • तोडगा न काढता बॅंकेच्या वतीने या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने २०१६ मध्ये कर्मचारी भरतीप्रक्रिया राबविली होती. संचालक मंडळाने या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठरावदेखील केला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची भरती करताना सहकारी विभागाच्या नियमांचे पालन करण्यात न आल्याने ही भरती वादात सापडली होती.
  • यातच जिल्हा औद्योगिक न्यायालयाने या कर्मचाऱ्यांची कायम करण्याची मागणी मान्य करण्यास नकार दिला. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्याने जिल्हा बँकेनेही या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची भावना झाली आहे. हे तात्पुरते कर्मचारी २०१६ पासून जिल्हा बँकेत अल्प वेतनावर काम करीत आहेत. कोरोना संकटातही त्यांनी बँकेत नियमित सेवा बजावली.
  • या निकालामुळे तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बँक प्रशासन व बँकेच्या वतीने न्यायालयात खटला लढणाऱ्या वकिलांविषयी नाराजी आहे. त्यांनी गत दोन वर्षांपूर्वी २० जून २०२२ मध्ये जिल्हा बँकेच्या जुन्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. तत्कालीन प्रशासक अरुण कदम यांनी त्या वेळी बैठक घेत समजूत काढली होती.
  • मात्र त्यानंतर आतापर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने या ३७२ हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रशासकास ५ एप्रिलला पत्र देत संप पुकारला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद ठेवले आहे. मागण्यांबाबत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. प्रशासकाने यावर तत्काळ तोडगा काढवा व न्याय द्यावा, अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
  • बॅंक प्रशासकाकडून नोटिसा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्यानंतर बॅंक प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. सतत गैरहजर असून, अशाप्रकारे सामुदायिक गैरहजर राहणे बेकायदेशीर आहे. आपल्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई का करू नये, गैरहजर कृत्यामुळे व गैरहजर कालावधी हा बिनपगारी म्हणून का गृहीत धरण्यात येऊ नये यासाठी ४८ तासांच्या आता खुलासा करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना बजाविली गेली आहे. खुलासा दाखल न केल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

District  Bank Bharti 2022

District Bank Recruitment 2022 process now online: Recruitment process in District Central Co-operative Banks will be done online. The government has directed that the recruitment process for various posts in District banks be conducted online only.An order has been issued to appoint an agency to conduct the recruitment process in the district banks on the basis of quality and transparency. Read More details as given below

जिल्हा बॅंकांमधील भरती प्रक्रियेमध्ये होणारी वशिलेबाजी आणि हस्तक्षेप यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रारी आल्याने त्याची दखल घेत ऑफलाइन पद्धतीने बँकेमध्ये भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याऐवजी परिक्षा घेणारी एजन्सीची नियुक्ती करून ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, असेही आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेवर नव्याने निवडून आलेल्या संचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जिल्हा बँकाकडून ऑफलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया होते. ही प्रक्रिया राबविताना अनेकदा अनियमितता होते, त्यातून वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील विविध पदांसाठीची नोकरभरती प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच परिक्षा घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशन, इंडियन बॅंक असोसिएशन, इंडियन बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन यासारख्या यंत्रणांचा समावेश करावा, असे आदेशात म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा बॅंकांमधील भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे व पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तरीय पॅनेल तयार करावे’

जिल्हा बॅंकांमधील ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकार आयुक्तांनी मागील वर्षी प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता, त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थांची अथवा एजन्सीची राज्यस्तरीय पॅनेल सहकार आयुक्तांनी तयार करावे. त्या पॅनेलमधून जिल्हा बॅंकेने एखाद्या एजन्सीची निवड करून त्यामार्फत भरती प्रक्रिया राबवावी, असे आदेश सहकार विभागाचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिले आहेत.

‘एजन्सी निर्दोष असावी’

एजन्सीची निवड करताना त्या एजन्सीने तीन वेळा ऑनलाइन नोकरभरतीची प्रक्रिया राबविलेली असावी, संबंधित एजन्सीविरुध्द यापूर्वी कोणत्याही नोकरभरतीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या चौकशीमध्ये गलथान व्यवस्थापन, भ्रष्टाचार, गुन्हेगारी पद्धतीचा हस्तक्षेप आदींबाबतीत दोषी असल्याचे सिद्ध झालेले नसावे. तसेच त्या एजन्सीचा काळ्या यादीत समावेश नसावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Rahel Anil Dhupdale says

    Bank madhe job hava ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!