इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाच सराव चाचण्या – 5th, 8th class exam
5th, 8th class Re-examination
5th, 8th class exam 2024 new update – Five practice tests for scholarship exams for 5th, 8th class. The education department will conduct five practice tests this year to prepare students of classes V and VIII studying in zilla parishad primary schools for scholarships. The first practice test will usually be conducted in the first week of December, the education department said. Testing for confidence building
The Pre-Upper Primary Scholarship Examination (E.5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E.8th) will be held in February 2025. To prepare for these exams, five practice exams will be planned from cess (self-income) funds. These exams will help in removing the fear of the students about the exam and boosting their confidence.
Five practice tests in two months — it’s assembly elections and all teachers are busy with work. So it is difficult to conduct practice exams before Diwali. The first practice scholarship test will be conducted in the first week of December after Diwali.
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाच सराव चाचण्या
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची तयारी व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून यावर्षी पाच सराव चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यातील पहिली सराव चाचणी साधारणत: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आत्मविश्वास वाढीसाठी चाचणी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. या परीक्षांची तयारी व्हावी यासाठी ५ सराव परीक्षांचे नियोजन सेस ( स्व उत्पन्न ) निधीतून करण्यात येणार आहे. या परीक्षांमधून विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. - दोन महिन्यात पाच सराव चाचण्या – विधानसभा निवडणुकीचा काळ असून या निवडणुकीत सर्वच शिक्षक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे दिवाळी अगोदर सराव परीक्षा घेणे अवघड आहे. त्यामुळे दिवाळीनंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली सराव शिष्यवृत्ती चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
5th, 8th class exam 2024 – There is a demand that the re-examination of students who have failed the annual examination of class V and VIII should be held in the second week of June. From this year, students who fail in the annual examination of classes 5-8 will be kept in the same class. However, a re-examination will be given once before that. The school education department has directed that the re-examination be conducted in the first week of June and the results should be declared before June 15. Lok Sabha elections were held during the summer vacation across the state by a slight margin. Due to Lok Sabha election training and election duty, not all teachers were able to go back to their native places even during the summer vacation. Pravin Puri, section organiser of the Maharashtra Progressive Teachers’ Association, said the teachers had gone back to their native places after the Lok Sabha elections due to family events and visits from relatives.
इयत्ता पाचवी आणि आठवीची ‘पुनर्परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घ्या’
इयत्ता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यंदापासून पाचवी-आठवीला वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. मात्र त्या आधी एकदा पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. ही पुनर्परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेऊन १५ जूनपूर्वी निकाल लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. थोड्याफार फरकाने संपूर्ण राज्यात उन्हाळी सुट्टीत लोकसभा निवडणुका होत्या. लोकसभा निवडणूक प्रशिक्षण आणि निवडणूक ड्युटीमुळे सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतही आपल्या मूळगावी जाणे शक्य झाले नाही. कौटुंबिक कार्यक्रम, नातेवाइकांच्या भेटी, यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिक्षक मूळ गावी गेले असल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे विभाग संघटक प्रवीण पुरी यांनी दिली.
5th, 8th class Re-examination – It was the state government’s policy not to fail from class 5th to8th class. Therefore, children who were raw in studies passed directly up to the eighth grade. This had an impact on the school certificate examination. The annual examination, re-examination and evaluation procedure for class 5th and 8th has now been fixed in the state. According to this, 50 marks for each subject in class 5 and 60 marks for each subject in class VIII will be held at the school level. The failed students will be given the opportunity to re-examine in June and if they fail in the re-examination, the student will be kept in the same class. The procedure will be implemented from this year itself. 5th 8th class Re-exam details given briefly below.
If the student does not pass the annual examination of 5th 8th class Re-exam, the 5th, 8th class re-examination will be conducted within two months of the result of the examination with additional supplementary guidance. Committees have been appointed at all three levels. State level, district level, taluka level, center level committees have been formed for monitoring and supervising annual examinations, re-examinations. The functions of this committee have also been fixed. Children teaching in the fifth grade of the primary school must score at least 18 marks per subject in that academic year and at least 21 marks per subject for the eighth grade. Marks will be awarded instead of grades in the marksheet. If a student fails, the exemption will be capped at a maximum of 10 marks. Children will be given the opportunity to re-examine if they fail or are absent from the exam.
पाचवी, आठवीसाठी पुर्नपरीक्षेची संधी, धोरणात बदल : यंदापासूनच या कार्यपद्धतीची अंमलबजावणी
5th 8th class Re-exam – पहिलीपासून आठवीपर्यंत नापास न करण्याचे राज्य शासनाचे धोरण होते. त्यामुळे अभ्यासात कच्ची असणारी मुले थेट आठवीपर्यंत पास होत असत. याचा परिणाम हा शालांत प्रमाणपत्र परीक्षेवर होत असे. आता राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीला प्रत्येक विषयासाठी ५० गुण, आठवीला प्रत्येक विषयाची ६० गुणांची परीक्षा शाळास्तरावर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुर्नपरीक्षेची संधी दिली जाणार असून, पुर्नपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवले जाईल. यंदापासूनच या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे; पण, या धोरणाची अमलबंजावणी झालेली नाही; पण, शिक्षण हक्क कायद्यातील कलम १६ नुसार, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही किंवा त्यास शाळेतून काढून टाकता येणार नाही. मात्र, केंद्र सरकारने कलम १६ मध्ये सुधारणा करून पाचवी, आठवीसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार पाचवी, आठवीसाठी परीक्षा लागू करण्यात आली आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांत पुर्नपरीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तीनस्तरावर समित्या नेमल्या आहेत. वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षेचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, केंद्रस्तर अशा समित्या स्थापन झाल्या आहेत. या समितीची कार्येही निश्चित केली आहेत. प्राथमिक शाळेतील पाचवीसाच्या वर्गात शिक्षकणाऱ्या मुलांना त्या शैक्षणिक वर्षातील प्रत्येक विषय किमान १८ गुण आणि आठवीसाठी प्रती विषय किमान २१ गुण प्राप्त करणे आवश्यक. गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण दिले जातील. विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे कमाल १० गुण अशी मर्यादा राहील. अनुत्तीर्ण झाल्यास किंवा परीक्षेस गैरहजर राहिल्यास पुनर्परीक्षेची संधी मुलांना दिली जाणार आहे.
…तर त्याच वर्गात ठेवणार – या पुर्नपरीक्षेत जर मुल अनुत्तीर्ण झाले तर त्यांना त्याच वर्गात ठेवले जाणार असल्याने आता प्राथमिक शाळेतील शिक्षणही खडतर होणार आहे. यामुळे शाळेची गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार आहे. तसेच मुलांचे शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठीचे शिक्षण दर्जेदार होण्यास मदत होणार आहे. आठवीपर्यंत मुलांना नापास केले जात नव्हते यामुळे बहुतांशी मुले ही दहावीच्या शालांत परीक्षेत मागे पडत होती. काही शाळांच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होत असे. आता, पाचवी आणि आठवीची परीक्षा होणार असल्याने शिक्षणाचा पाया मजबूत होणार आहे. यामुळे शाळांच्या गुणवंत्तेची ही कस लागणार आहे.