5% Reservation for Police Bharti
5% Reservation for Police Bharti
‘पोलिस भरतीत द्या पाच टक्के आरक्षण’
Police Bharti 2029 Reservation : At present, the recruitment rules should be changed for the benefit of the reservation for the police constable in the recruitment of police Bharti in Maharashtra, and the then home minister R R. According to Patil’s decision, five percent reservation should be applied immediately. R. Foundation Chairman Vinod Patil has made a statement to Home Minister Eknath Shinde.
औरंगाबाद: सध्या पोलिस भरतीमध्ये पोलिसांच्या पाल्यांना आरक्षणाचा लाभ प्रत्यक्षरित्या होण्यासाठी भरती नियमात बदल करावा, तसेच २०१४ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सरसकट पाच टक्के आरक्षण लागू करावे अशी मागणी आर. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे पोलिस कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर आरक्षणाचा उपयोग घ्यावा असा नियम आहे. पोलिस कर्मचारी ५८व्या वर्षी निवृत्त होत असताना त्याच्या पाल्याचे वय ३२ ते ३३ वर्षाच्या जवळपास असते. आणि पोलिस भरतीचे वय १८ ते २८ वर्षे आहे. यामुळे नियमात बदल करण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
सौर्स : मटा