12 lakh application for 8000 posts of Police Constable
12 lakh application for 8000 posts of Police Constable
पोलीस कॉन्स्टेबलची ८ हजार पदे, १२ लाख अर्ज
Police Bharti 2020 Application Form : 12 lac applications was received for the 8000 posts of Police Constable Post. About 8 lakh candidates have applied for the constitution of 8,000 posts in the state police department. It is being said that in order to save on time and cost, it will be considered by the corporation to take the offline test without taking the online exam. Read the complete given below, and keep visit us for further updates.
राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती
Police Recruitment 2020 – 8000 posts
मुंबई: राज्याच्या पोलीस विभागात कॉन्स्टेबलच्या आठ हजार पदांसाठी भरती होणार असून, त्यासाठी तब्बल १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. वेळ आणि खर्चात बचत करण्यासाठी महापोर्टलद्वारे ऑनलाइन परीक्षा न घेता ऑफलाइन परीक्षा घेण्याचा विचार करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील अनेक परीक्षार्थींनी पोर्टलच्या अचुकतेवर शंका उपस्थित केली होती. या महापोर्टलवर बंदी आणली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच महापोर्टलला स्थगिती देण्यात आली आहे. ‘अनेक परीक्षार्थींनी महापोर्टलवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळं आम्ही अन्य पर्यायाचा विचार करत आहोत. नक्कीच योग्य पर्यायाची निवड करून लवकरच परीक्षा घेऊ अशी आम्हाला खात्री आहे, ‘असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं. ‘१२ लाख उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी किमान ४५ दिवस लागतील आणि प्रश्नपत्रिकांचे ९० संच तयार करावे लागतील सरकारनं त्याच दिवशी आणि त्याच प्रश्नपत्रिकांद्वारे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा विचार करावा, अशी इच्छुक उमेदवारांनी इच्छा आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीमधील पदांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शीपणा येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारनं २०१७मध्ये महापोर्टल सुरू केलं होतं.
दरम्यान, गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापोर्टलसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला होता. ‘महापरीक्षा पोर्टल’मधील त्रुटी दूर होईपर्यत, त्याद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला होता. संबंधित सर्व उपाययोजना केल्यानंतर परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
तत्पूर्वी, देशात बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी दिलासा देणारी घोषणा केली होती. पोलीस विभागातील रिक्त पदं भरण्यात येतील अशी घोषणा गृहविभागातर्फे करण्यात आली होती. गृह विभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. या पोलीस भरतीमुळं राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौर्स : मटा