यंदा अकरावीच्या ४२ हजारांहून अधिक जागा रिक्त, येथे पहा..! – 11th Admission Merit list 2024

FYJC Admission 2024 2nd Merit List

Mumbai 11th Admission 2024 | FYJC Admission 2024 – In the last few years, the percentage of 11th class admissions has been steadily declining. More than 30,000 seats remain vacant every year. Seats for class XI admissions have also increased significantly due to recognition of colleges and increase in faculty. There are no admissions in comparison. This gap is affecting the vacancies and the percentage of vacancies seems to be increasing every year itself.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत रिक्त जागांचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा अकरावीच्या ४२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. यंदा ३४३ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण १ लाख २० हजार ८०५ जागांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात १ लाख ४ हजार १६० जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर १६ हजार ६४५ जागा राखीव कोट्यासाठी उपलब्ध होत्या. या अंतर्गत तीन नियमित फेऱ्या, सहा विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या. तसेच दैनंदिन गुणवत्ता फेरीही राबवण्यात आली. यातून एकूण ७८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी ९४०० कोट्यातील जागांवर, तर ६९ हजार २१८ प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे झाले. त्यामुळे ४२ हजार १८७ जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीभूत प्रवेशांच्या ३४ हजार ९४२, तर राखीव कोट्याच्या ७ हजार २४५ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. झालेल्या प्रवेशांमध्ये कला शाखेत ७ हजार ३९०, वाणिज्य शाखेत २९ हजार ८१९, विज्ञान शाखेत ३९ हजार ६४३, तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी १ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत अकरावीच्या प्रवेशाचा टक्का सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी सुमारे ३० हजारांहून अधिक जागा रिक्त राहतात. महाविद्यालयांना मान्यता, तुकडीवाढ अशा कारणांनी अकरावी प्रवेशासाठीच्या जागाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या तुलनेत प्रवेश होत नाहीत. या तफावतीचा परिणाम जागा रिक्त राहण्यावर होत असून, दरवर्षीच रिक्त जागांचा टक्का वाढत असल्याचे दिसून येत आहे.


Mumbai 11th Admission 2024 Second Merit List 2024 | FYJC Admission 2024 2nd Merit List declared today. The second merit list for class XI admissions will be released on Wednesday. How many students will be admitted in the second list of admissions? All eyes are on how many more cut-offs will come down. Since the cut-off of most of the big colleges in the first list is above 90 per cent, students and parents will be watching to see how much the cut-off falls in the second list. 11th Admission Merit list 2024
The first list of class XI admissions was released on June 27. This year, 2,74,567 students who passed out from Mumbai participated in the admission process. Of these, 1,30,650 students were admitted. However, 76,577 students were admitted. Of these, 9,020 students opted for arts, 35,675 for commerce and 31,297 for arts.

  • इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार? आणखी ‘कट ऑफ’ किती गुणांनी खाली येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पहिल्या यादीत बहुतांश मोठ्या महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ ९० टक्क्यांच्या वर असल्याने दुसऱ्या यादीत ‘कट ऑफ’ किती खाली उतरतो, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष असणार आहे.
  • अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ जूनला जाहीर झाली होती. यंदा मुंबईतून उत्तीर्ण झालेले दोन लाख ७४ हजार ५६७ विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले होते. यापैकी एक लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. मात्र, ७६ हजार ५७७ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती केली. त्यातील नऊ हजार ०२० विद्यार्थ्यांनी कला, ३५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली.

11th online admission 2nd round cut off 2024


Mumbai 11th Admission 2024 Second Merit List 2024 – The second merit list for class 11 online admission will be released on July 10. Saturday is the last day for students who have not been admitted to fill the preference order, including making corrections in the first part of the application, as well as for students who have not filled the application form. The list includes 15,000 students who did not apply earlier. 

  • In the first list of Class XI, applications of 2,28,312 students were finalized. Of these, 1,30,645 were admitted. Of these, 57,450 students applied to the college.
  • Among those who applied, 97,662 students who did not get admission are around 15,000 students who have applied again.
  • Saturday is the last day to apply and change your preference.
  • The application forms submitted by the students between July 7 and 9 will be scrutinised and the merit list will be released at 10 am on July 10.
  • Students who have been declared admitted in the merit list can visit junior colleges between July 10 and 12 to confirm their admission.
  • Only on July 12, junior colleges will be able to show the status of the admitted students on the portal.
  • Also, the admission process for quota admission can be implemented on the same day.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीच्या अर्जासाठी आज शेवटचा दिवस

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी १० जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या पहिल्या भागात दुरूस्ती करण्यासह पसंतीक्रम भरण्यासाठी तसेच अर्जच न भरलेल्या विद्यार्थ्यांना या यादीत समावेशासाठी शनिवारी शेवटचा दिवस आहे. या यादीत पूर्वी अर्ज न केलेल्या १५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.

Mumbai 11th Admission 2024 Second Merit List 2024

  • अकरावीच्या पहिल्या यादीत २ लाख २८ हजार ३१२ विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ६४५ जणांना प्रवेश मिळाले. त्यापैकी महाविद्यालयात जावून ५७ हजार ४५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
  • अर्ज केलेल्यांपैकी प्रवेश न मिळालेले ९७ हजार ६६२ विद्यार्थी असून, या यादीत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत.
  • अर्ज करण्याची व पसंतीक्रम बदलण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे.
  • ७ ते ९ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाचे परीक्षण व १० जुलैला सकाळी १० वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १० ते १२ जुलैदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येईल.
  • तर १२ जुलैलाच कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर दाखवता येईल.
  • तसेच याच दिवशी कोटा प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया राबवता येईल.

Mumbai 11th Admission 2024 1st round First Merit List 2024 Declared and 2nd round process has been start here. 11th Admission 2024 2nd round time table is given below. The 11th admission process has picked up pace and the first phase has been completed. The process of filling part two of the application will begin on Wednesday (July 3) and students will be able to fill the application form till Saturday (July 6). An online centralised admission process is being implemented for class 11th admissions in junior colleges. Accordingly, three rounds have been planned for admission this year, while the admission process for the second round ended on Tuesday (July 2). According to the schedule released by the Education Department, interested students will be able to enter the preference order by filling part two of the application from Wednesday (December 3). The deadline to fill out Part TWO of the application is Saturday (July  6). 

अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन भरण्यास सुरुवात..!

अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बुधवारी (दि. ३) अर्जाचा भाग दोन भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत असून शनिवार (दि. ६) पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रकिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार यंदा प्रवेशासाठी तीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दुसऱ्या फेरीसाठीची प्रवेशप्रक्रिया मंगळवारी (दि. २) संपली. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवार (दि. ३) पासून अर्जाचा भाग दोन भरून पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी शनिवार (दि. ६) पर्यंत मुदत आहे.

2nd round Time Table – दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक असे…

  • अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत – ३ ते ६ जुलै
  • माहिती विश्लेषणासाठी मुदत – ७ ते ९ जुलै
  • दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी – १० जुलै सकाळी १० वाजता
  • यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत – १० ते १२ जुलै

11th online admission Process 2024

Online Admission Link

11th online admission 1st round cut off 2024

FYJC Admission – अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा…

11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे


Mumbai 11th Admission 2024 FYJC First Merit List 2024 Declared now. The first merit list for online admission to 11th class in junior colleges in the Mumbai Metropolitan Region was released today. The cut-off for science and commerce streams in reputed colleges in Mumbai has crossed 90 per cent. After state education board students, the highest number of admissions have been fixed for ICSE and then CBSE board students. This year too, there is a big competition for cut-offs among reputed colleges. There were 2,49,050 seats available for the first round of admissions in the Mumbai Metropolitan Region this year. However, 2,28,312 students had applied for the same. Of these, 1,30,650 seats have been allotted to students (seat allotted) and as many as 97,662 seats remained vacant in the first round. 

मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत विज्ञान आणि वाणिज्य शाखेची कटऑफ ही ९० टक्क्यांपार पोहोचली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनंतर सर्वाधिक प्रवेश हे आयसीएसई आणि त्यानंतर सीबीएसई मंडळातील विद्यार्थ्यांचे निश्चित झाले आहेत. यामुळे यंदाही नामांकित महाविद्यालयांत कटऑफसाठी मोठी स्पर्धा आहे. मुंबई महानगरक्षेत्रात यंदा पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी दोन लाख ४९ हजार ५० जागा उपलब्ध होत्या. मात्र, त्यासाठी दोन लाख २८ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख ३० हजार ६५० जागांवर विद्यार्थ्यांचे (जागा अॅलॉट) प्रवेश निश्चित झाले असून तब्बल ९७ हजार ६६२ जागा या पहिल्या फेरीत रिकाम्या राहिल्या आहेत.

  • विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास – विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या ऑप्शनवर क्लिक करून कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले आहे हे तपासून घ्यावे. ऑप्शनवर क्लिक करून आपली कागदपत्रे अपलोड करून ‘प्रोसीड फॉर अडमिशन’ या ऑप्शनवर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा.
  • विद्यार्थ्यांनी अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या
  • ज्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय अॅलॉट झाले नसेल, त्यांनी आपल्याला दहावीत मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कटऑफ याचा विचार करून दुसऱ्या फेरीत प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरून आपला प्रवेश अर्ज भाग २ लॉक करावा

५५,६५५ विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज – अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल ५५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाची महाविद्यालये मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीची केवळ २० हजार ७८३, १४ हजार ४४८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीची महाविद्यालये मिळाली आहेत. या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश नाकारला अथवा घेतला नाही तर पुढील दुसऱ्या फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे

महाविद्यालये आणि कटऑफ (टक्के)

  • एचआर महाविद्यालय वाणिज्य ९३
    रुपारेल महाविद्यालय
    झेवियर्स महाविद्यालय कला ९३.४
    वाणिज्य ८९.२ सायन्स ९१.६
    केसी महाविद्यालय
    कला ८६
    वाणिज्य ९१.४
    विज्ञान ८७.६
    जयहिंद महाविद्यालय
    कला ८९.६
    वाणिज्य ९१.६
    विज्ञान ८८.८
    रुईया महाविद्यालय
    कला १२.२
    विज्ञान ९३.४
    पोदार महाविद्यालय वाणिज्य ९४.४
    कला ८५.८
    वाणिज्य ९०.६
    विज्ञान ९१.८
    साठ्ये महाविद्यालय
    वझे-केळकर महाविद्यालय
    कला ८८.४
    वाणिज्य ९२.४ विज्ञान ९२.८
    एसआयईएस
    कला ८१
    महाविद्यालय
    वाणिज्य ८९.२ विज्ञान ९०.६
    वाणिज्य ८७.२
    डहाणूकर महाविद्यालय
    वाणिज्य १०.८
    भवन्स महाविद्यालय
    कला ८२.६
    वाणिज्य ८९.८
    विज्ञान ८५.४
    मिठीबाई महाविद्यालय
    कला ८६.८
    वाणिज्य ९१
    विज्ञान ८९.४
    मुलुंड महाविद्यालय वाणिज्य ९२
    सीएचएम महाविद्यालय
    कला ६६.२
    वाणिज्य ८३.८
    विज्ञान ९०
    फादर अँग्नेल
    महाविद्यालय
    वाणिज्य ८७ विज्ञान ९३.८
    एनएम महाविद्यालय वाणिज्य ९३.४
    बांदोडकर महाविद्यालय विज्ञान ९२.४

FYJC Admission Announced The First Special Merit List

The first Merit list of the eleventh online admissions has been announced. A total of 76 thousand 203 students submitted applications for 1 lakh 45 thousand 473 seats. Of these, 64 thousand 866 students were allotted colleges.

Fyjc Admission: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १ लाख ४५ हजार ४७३ जागांवर एकूण ७६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. यातील ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले.

कला शाखेच्या एकूण १८ हजार २५४ जागांसाठी ५ हजार ४४१ अर्ज आले आहेत. त्यातील ५ हजार २७९ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहेत. वाणिज्य शाखेच्या ७९, ५५४ जागांसाठी ४५, ४४१ अर्ज आले असून ३७, ४८५ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले. विज्ञान शाखेच्या एकूण ४४,५७४ जागांसाठी २४, ६८९ अर्ज आले. त्यातील २१,४७९ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले. एचएसव्हीसीच्या एकूण ३०९० जागांसाठी ६३३ विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यात ६२३ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले.

मंडळनिहाय अर्ज सादर केलेले आणि अलॉटमेंट झालेले विद्यार्थी

एसएससी बोर्डाअंतर्गत एकूण ७१ हजार ६५० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून ६० हजार ७४९ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले. सीबीएसई बोर्डाकडे २१२३ अर्ज आले असून १८७० विद्यार्थ्याना कॉलेज अलॉट झाले. आयसीएस बोर्डाकडे १५८० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून १४७७ कॉलेज अलॉट झाले.

Mumbai 11th online admission Process 2024

Online Admission Link

11th Admission- अकरावी एडमिशन साठी लागणारी कागदपत्रे

11th Admission -आठवडाभरात सुरू होईल अकरावी प्रवेश प्रक्रिया 


Maharashtra FYJC Admission 2024 Third Merit

११वी ऑनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (First year junior college – FYJC) प्रवेश (FYJC Admission) 2021 साठी तिसरी गुणवत्ता यादी आज (ता. 13) जाहीर करण्यात आली आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये अकरावी इयत्तेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांनी अधिकृत वेबसाईट 11thadmission.org.in वर गुणवत्ता यादी 2021 तपासावी

अशी तपासा तिसरी गुणवत्ता यादी-FYJET Merit List 

  • तिसरी गुणवत्ता यादी तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाइट 11thadmission.org.in ला भेट द्यावी.
  • पुढे मेन पेजवर उपलब्ध असलेल्या प्रदेशावर क्‍लिक करावी.
  • आता तुम्ही एका नवीन पेजवर याल. येथे विद्यार्थी लॉगइन लिंकवर क्‍लिक करा.
  • आता तुमचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यानंतर वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • विद्यार्थ्यांनी ती तपासावी व भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवावी.

In Mumbai, Pune, Pimpri-Chinchwad, Nashik, Amravati and Nagpur Municipal Corporation areas, the third quality list of 11th online admission will be announced today

FYJC Third Merit List : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात आज, सोमवारी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यासोबतच इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाचीही तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळतील. त्यांना आपल्या लॉगइनवर कॉलेजांची माहिती आणि कट ऑफही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत. या गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.


Maharashtra FYJC Admission 2024 Second Merit

The second merit list in the 11th admission process was released on Saturday, September 4. Students can view this list by visiting the official website of Eleventh Admission. They will also receive an SMS alert about their entry.

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी शनिवारी ४ सप्टेंबर रोजी जाहीर झाली. विद्यार्थी अकरावी प्रवेशांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही यादी पाहून शकता. शिवाय त्यांना त्यांच्या प्रवेशाबाबतच्या माहितीचा अलर्टही एसएमएसद्वारे मिळणार आहे. मुंबई विभागात एकूण ६०,०३७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत प्रवेश अलॉट झाले आहेत.

  • मुंबई विभागाची शाखानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे -शाखा — एकूण जागा (कोटा वगळून) — एकूण अर्ज — अलॉट झालेले प्रवेश
  • कला — १७,६०५ — ९,८९१ — ५,१२५
  • वाणिज्य – ७७,२५९ — ८०,७५८ — ३७,१८६
  • विज्ञान — ४२,१८८ — ४२,४६७ — १७,३३३
  • एमसीव्हीसी — २,७४२ — ६०७ — ३९३
  • एकूण विद्यार्थी — १,३९,७९४ — १,३३,७२३ — ६०,०३७

अकरावी प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा…


Maharashtra FYJC Admission 2024 First Merit

The first quality list of 11th online admissions was released on Friday, August 27, 2021 at around 10 am. Two lakh 37 thousand 383 students had registered for the eleventh admission for three lakh 20 thousand 710 seats in Mumbai division. Of these, only two lakh two thousand 58 students were filled with college choice options.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल तीन लाख २० हजार ७१० जागांसाठी दोन लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील अवघ्या दोन लाख दोन हजार ५८ विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरलेले होते.

तुम्हाला पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झाले आहे का ते पुढील पद्धतीने पाहता येईल –

– सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.

How to Download Merit List 

  • – सर्वात आधी अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे संकेतस्थळ https://mumbai.11thadmission.org.in/ वर जा.
  • – आपला आयडी पासवर्ड देऊन लॉग इन करा.
  • – लॉग इन केल्यावर स्क्रीनवर तुमचे डिटेल्स येतील.
  • – डॅश बोर्डवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ पर्यायावर क्लिक करा.
  • – कॉलेज अलॉट झालं असेल तर त्याचं नाव येथे दिसेल.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ – mumbai.11thadmission.org.in


11th Admission 2024

According to the school education minister’s tweet, the allotment list and cut-off list for the admission round will be announced on August 27. This will be followed by three more rounds. New registrations will also be accepted in these rounds. This round is for the eleventh entry in MMR and Corporation areas at Pune, Pimpri Chinchwad, Nagpur, Amravati, Nashik. MMR is a Mumbai metropolitan area.

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

FYJC Admission 2021: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफची पहिली यादी (FYJC Admission 2021) २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटनुसार, ‘प्रवेश फेरीसाठी अलॉटमेंट यादी आणि कट ऑफ यादी २७ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. यानंतर आणखी तीन फेऱ्या होतील. या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.


Class XI admission process is being implemented through central online admission system. The list of potential qualifiers for the first round will be announced on Monday.

अकरावी प्रवेशाची संभाव्य गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

 केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धतीद्वारे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या प्रवेश फेरीतील संभाव्य गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रम नोंदवण्याबाबत अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचे आढळून आलेले आहे.

 अकरावी प्रवेशासाठीची “सीईटी’ रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्काळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या नियमित प्रवेश फेरीच्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण 310 कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी नोंदणी केली असून, प्रवेशाच्या 1 लाख 10 हजार 765 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.

FYJC Admission – अकरावी प्रवेश अर्ज कसा भरायचा…

Online 11th Admission 2021 process has been started now. Here we are giving step by step information on how to fill Part 1 and Part 2 of the application by the students…

Complete Steps are given here – स्टेप बाय स्टेप जाणून घ्या…

11th Online Admission 2021 Time Table

  • Part One Filling: 14th to 22nd August
  • Part one and two filling: 17th to 22nd August
  • Admission Quality List: 27th August
  • Admission: 27th to 30th August
  • Second round of admission: 31st August to 4th September
  • Third round of admission: 5th to 11th September
  • Fourth round of admissions: September 12 to 17

The 11th admission in the state’s metros will be done through the central online system, for which applications are being submitted from August 16. This online process is being implemented for the 11th admission in Mumbai, Pune, Pimpri Chinchwad, Nashik, Amravati, Nagpur municipal areas.

FYJC class 11th Admission Online Admission

राज्याच्या महानगरांतील अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यार्थी आणि पालिकांमधील संभ्रम, तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जागृतीचा अभाव असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधाच मुदतवाढ करत १६ ऑगस्टपासून सूरू करण्यात येत असल्याचे जगताप यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव व्हावा म्हणून मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार (ता.१३) पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर सर्व माहिती नष्ट होईल आणि १६ तारखेनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यात येईल.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

(फक्त संबंधित महापालिका क्षेत्रांसाठी)

कार्यवाहीचे टप्पे – कालावधी , कोण करणार

  • १) अ) संकेतस्थळावर विद्यार्थ्याने ऑनलाइन नोंदणी करणे. लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करणे. ब) अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि शुल्क भरणे क) अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित करणे, शाळा निवडणे आणि अर्ज व्हेरिफाईड झाल्याची खात्री करणे ः १६ ऑगस्टपासून (हे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने करावे)
  • २) विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती भाग-१ ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे : १७ ऑगस्टपासून (माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शक केंद्रांनी करावे)

महत्त्वाचे काय?

  • – सराव म्हणून संकेतस्थळावर १३ तारखेच्या आत डेमो अर्ज भराल
  • – यात अडचण आल्यास आपल्या शाळेशी संपर्क साधा
  • – १३ तारखेनंतर हे अर्ज नष्ट होतील
  • – पालकांच्या मदतीने प्रत्यक्ष अर्ज १६ तारखेपासून भरावे
  • अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ –

https://11thadmission.org.in/


The Department of School Education has published the schedule of Class XI Central Online Admission Process. Accordingly, the process of filling the first part of the application will start from 9th August 2021. So, the schedule for filling the second part will be announced in due course, informed the Director of Secondary Education, Dinkar Temkar

FYJC CET Exam -अकरावी प्रवेशाच्या CET साठी आजपासून करता येणार अर्ज

 अकरावी प्रवेशप्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु

 शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तर, दुसरा भाग भरण्यासाठीचे वेळापत्रक यथावकाश जाहीर होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली.

 पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर 1 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून भरलेली माहिती प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 9 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी लिंक खुली केली जाणार आहे. विद्यार्थी स्वत: अथवा पालकांच्या मदतीने किंवा शाळा आणि मार्गदर्शन केंद्राची मदत घेऊन अर्ज करू शकतील. प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी मिळवणे व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरावा. शुल्क भरून अर्ज लॉक करणे आवश्‍यक आहे.

 भाग 2 भरण्याचे वेळापत्रक यथावकाश जाहीर होणार 

अकरावी प्रवेशासाठी भाग 1 व भाग 2 असे अर्ज करावे लागतात. भाग 1 मध्ये विद्यार्थ्यांची सर्व वैयक्‍तिक माहिती असते. त्यानुसार शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणे प्रारंभी भाग 1 भरण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यंदा सीईटीची परीक्षा, निकाल आणि दहावी निकालाचे मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतरच भाग 2 भरण्याचे वेळापत्रक यथावकाश जाहीर केले जाणार आहे.

 अर्जाच्या सरावासाठी मॉक डेमो 

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी कोणतेही अडचण होऊ नये, यासाठी त्याचा सराव होण्याच्या दृष्टीने प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा संकेतस्थळावर 1 ते 7 ऑगस्टपर्यंत देण्यात येत आहे. मॉक डेमोमध्ये भरलेली माहिती दि. 8 ऑगस्ट रोजी नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी दि. 9 ऑगस्टपासून नव्याने विद्यार्थी नोंदणी, लॉगीन करून अर्ज भरावयाचा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


11th CET Exam Format

The format of the Eleventh Common Entrance Test (CET) to be conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Examination has been announced. The examination for the eleventh admission will be completely optional. The Common Entrance Examination will be based on the State Board’s X syllabus.

FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

FYJC CET-अकरावी प्रवेश परीक्षा जुलैअखेर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्याअकारावी सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) स्वरुप जाहीर झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे.

या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice Objective Type Question)स्वरुपाचे असणार आहे.

12th CET बारावी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती- जाणून घ्या !

या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी २ तासांचा असणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर परीक्षेला बसायचे की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

फीस भरावी लागणार का ?
दहावीची परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी सामाईक परीक्षेसाठी कोणते शुल्क भरावे लागणार नाही. असे असले तरी CBSE, ISCE आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

कधी होणार परीक्षा ?
दहावीचा निकाल १५ जुलै दरम्यान लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर २ आठवड्यात म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरिस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अकरावी CET परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

११ वी CETचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी इथे क्लिक करा


FYJC class 11th Admission Process

अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया…

FYJC Class 11th Admission Process : Even though the state school education department has decided to cancel the 10th Class Exam and pass the students, how exactly will the students marks will be calculated? Such a question was raised by the students and parents. Finally, today, the state’s school education minister Varsha Gaikwad announced the 10th Marks Calculation formula. He also announced that there will be an Alternative Shared Examination (CET) for Class 11 Admission.

इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला. यासोबतच इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं.

  • इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे.
  • विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे.
  • CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे.
  • परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • इयत्ता ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

11th Admission 2024 Date Details

अकरावी प्रवेश 2024 प्रक्रिया बद्दल माहिती

11th Admission 2021 Updates : 11th Admission must be completed by September every year. Usually the first phase of the actual application begins in the second week of April. This time the process will be postponed and it may have direct impact on access. Corona’s Effect has been the subject of most examinations this year. This is going to affect all upcoming academic sessions. Every year, preparations for the eleventh admission process begin in the summer. This year, it is possible to drop the Class XII examination due to partial, school closure. Read the details carefully..

शिक्षण विभागाचा अपडेट – दहावीचा शेवटचा पेपर कधी?

दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे

कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.

सौर्स : सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!