समाज कल्याण विभाग २१९ जागेच्या भरतीची फस्ट रिस्पॉन्स शीट उपलब्ध – Samaj Kalyan Vibhag Bharti Results, Response Sheet
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Results, Answer key and Objection Window is available now – The answer sheet (Response Sheet) in accordance with the answers submitted by the candidates during the said examination will be made available on the candidates’ login ID from 4:00 PM on March 24, 2025 to 6:00 PM on March 28, 2025.
- समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (महिला), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. ०४ ते १९ मार्च, २०२५ रोजी पार पडल्या आहेत.
- सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) दि. २४ मार्च, २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासुन ते दि. २८ मार्च, २०२५ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- सदर उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना / आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पध्दतीने दि. २४ मार्च, २०२५ ते दि. २८ मार्च, २०२५ या कालावधीत नोंदविता येतील. आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सूचना / आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- प्रति आक्षेप ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.
- उपरोक्त प्रमाणे दि. दि. २४ मार्च, २०२५ ते दि. २८ मार्च, २०२५ या कालावधीत फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वतःच्या लॉगीन आयडीवरुन नोंदविलेले सूचना / आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सूचना / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सूचना / आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Samaj Kalyan Vibhag Response Sheet